काळे गट

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थित बुधवारी मा.आ.अशोकराव काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थित बुधवारी मा.आ.अशोकराव काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा

३०० कोटीच्या विकास कामांचे होणार भूमिपूजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ ऑगस्ट २०२४ :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांचा ७१ वा अभीष्टचिंतन सोहळा व ३०० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते व महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवार (दि.२१) रोजी संपन्न होणार असल्याची माहिती माजी आमदार अशोकदादा काळे मित्र मंडळाचे वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात

                       कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आदर्श समाजकारणाचा वसा पुढे चालवितांना आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला आकार दिला. विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील वर्षानुवर्षापासून रखडलेल्या अनेक महत्वपूर्ण विकासकामे माजी आमदार अशोकराव काळे यांनी पूर्ण केली. गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी सेतू उभारून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न सोडविला. यामध्ये प्रामुख्याने कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर चासनळी, धारणगाव-कुंभारी, कोपरगाव शहरातील अ.नगर-मनमाड महामार्गावरील समांतर पूल तसेच कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल आदी पूल बांधले. तसेच तहसील कार्यालय, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पशु चिकित्सालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी शासकीय इमारती बांधल्या. यामध्ये धारणगाव-कुंभारी पुलामुळे कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग कोपरगावला कायमचा जोडला जावून कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलण्यास मोठी मदत झाली.

जाहिरात

            कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा कार्यभार सांभाळत असतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच उच्चांकी दर देवून मतदार संघाच्या विकासाबरोबरच कारखाना देखील प्रगतीपथावर ठेवला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळे कारखान्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असून आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून व आमदार अशोकदादा काळे मित्र मंडळाचे वतीने हा ७१ वा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जल जीवन मिशन अंतर्गत १६५.५० कोटीच्या कामाचे भूमिपूजन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते, पूल, तीर्थक्षेत्र व उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारत भूमिपूजन एकूण (६०.८२ कोटी),मृद व जलसंधारण विभागाचे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खोलीकरण, रुंदीकरण कामे (५.३० कोटी), नगर विकास विभाग कोपरगाव शहरातील हद्दवाढ भागातील विकास कामे (१० कोटी), ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -२ जिल्हा वार्षिक योजना रस्ता दर्जोन्नती, रा.मा.६५ (बहादरपूर) ते रांजणगाव देशमुख रस्ता (४.१२ कोटी), जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गोदावरी डावा कालवा (१३ कोटी) व उजवा कालवा (३.२७ कोटी) १६.२७ कोटी निधीतून पाईप मोऱ्या बांधकाम करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोपरगाव आगार इमारत पुनर्बांधणी व व्यापारी संकुल उभारणे (१०.९२ कोटी), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ब्राम्हणगाव येथील सबस्टेशन लोकार्पण करणे(४.५० कोटी) आदी ३०० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या समवेत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख, मा.आ. भानुदास मुरकुटे, मा.आ. नरेंद्रजी घुले,आ. माणिकरावजी कोकाटे मा.आ.चंद्रशेखरजी घुले पा.,आ. किशोर दराडे, आ.किरण लहामटे. आ. संग्राम जगताप आदी मान्यवरांसह जिल्ह्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार अशोकदादा काळे मित्र मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे