आपला जिल्हा

मुर्शतपुर येथील चंद्रभागाबाई शिंदे यांचे मरणोत्तर नेत्रदान समाजापुढे ठेवला आदर्श 

मुर्शतपुर येथील चंद्रभागाबाई शिंदे यांचे मरणोत्तर नेत्रदान समाजापुढे ठेवला आदर्श 
मुर्शतपुर येथील चंद्रभागाबाई शिंदे यांचे मरणोत्तर नेत्रदान समाजापुढे ठेवला आदर्श 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ ऑगस्ट २०२५कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील चंद्रभागाबाई बापूराव शिंदे वय ७५ वर्ष यांचे रविवारी १७ ऑगस्टला निधन झाले. त्यांनी रामानंदाचार्य  सांप्रदायमार्फत यापूर्वीच मरणोत्तर देहदान व नेत्रदानाचा संकल्प केला होता. मधुमेह असल्याने त्यांचे देहदान करता आले नाही मात्र त्यांचे नेत्रदानाची इच्छा पूर्ण झाली. मरणोत्तर नेत्रदान करून त्यांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

जाहिरात
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य संप्रदायच्या वतीने  शिंदे यांचे 
 इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान साईनाथ नेत्र पेढी साईनाथ रुग्णालय शिर्डी येथे करण्यात आली. नेत्रदानाची सर्व प्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक गावित्रे व त्यांच्या टीमने केली.

जाहिरात
यावेळी बापूराव शिंदे, भाऊसाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे, मंदाकिनी पवार, सीताबाई शिंदे, सविता शिंदे ,सुनीता शिंदे, धनराज तुवर, दिपाली जावळे, रूपाली जाधव,अभिषेक शिंदे, मयूर शिंदे, योगिता तुवर, अश्विनी जगताप ,अस्मिता पवार, पुनम जावळे, प्रियंका तुवर, दिगंबर शिंदे, शिरीष शिंदे, लक्ष्मण शिंदे , व्यंकटराव जावळे, काकासाहेब जावळे, रामानंदाचार्य सांप्रदायच्या वतीने आहिल्यानगर मधील पिठ अध्यात्मिक प्रमुख जगन बोठे, सोमनाथ येवले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय बारसे, प्रोटोकॉल अधिकारी नवनाथ  गुडघे निरीक्षक धार जिल्हा (मध्य प्रदेश) ,संदीप सुरासे जिल्हा देणगी प्रमुख प्रवचनकार शिवनाथ लोहारकर,सोनाली जाधव,उज्वला कोल्हे, छाया भारती,बाळासाहेब घायतडकर, सुरेखा शिंदे,संदीप दीक्षित ,तुषार केकान, अशोक देसाई,अन्नपूर्णा देसाई, बाळासाहेब जाधव, किशोर टिळेकर ,मंदाकिनी टिळेकर, दिनेश जाधव, ज्ञानेश्वर लांडगे, चेतन पालकर ,विजय जेजुरकर यांच्यासह कोपरगाव व राहता तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
 रामंदाचार्य यांच्या वतीने आत्तापर्यंत १३६ देहदान देखील करण्यात आले असून जानेवारी २०२५ पर्यंत १ लाख ३४ हजार ब्लड बॅग डोनेट करून दिल्या असे प्रत्येक वर्षी चालू असते ब्लड इन नीड ही संप्रदायाची वेबसाईट आहे तिच्या मार्फत वर्षभर मागील तेव्हा ब्लड डोनर हजर होत असतो ५३ अँब्युलन्स विनामूल्य अहोरात्र २४ तास महाराष्ट्र राज्यातील विभिन्न राष्ट्रीय  महामार्गावर सेवा देत आहे आपतग्रस्तांना मदत शैक्षणिक उपक्रम वेदपाठ शाळा वैद्यकीय सहायता विनामूल्य हॉस्पिटल अपंगग्रस्तांना मदत गरीब शेतकऱ्यांना मदत घर वापसी कार्यक्रम निराधार महिलांना मदत असे अनेक उपक्रम रामानंदाचार्य संप्रदाय तर्फे चालू आहेत अशी मध्यप्रदेश धार जिल्ह्याचे निरीक्षक नवनाथ गुडघे यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे