मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे यासाठी कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे यासाठी कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे यासाठी कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन

कोपरगाव विजय कापसे दि २८ ऑगस्ट २०२४ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली असून तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारावे यासाठी गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी २.०० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याचे असंख्य शिवप्रेमींना दु:ख झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा व दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक तातडीने उभे करावे अशी तमाम शिवप्रेमींची मागणी आहे. ह्या मागणीसाठी गुरुवार (दि.२९) रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोपरगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून आ.आशुतोष काळे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहे. तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
