गौतमच्या हॉकी संघाची राज्यस्तरावर निवड; राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत करणार पुणे विभागाचे नेतृत्व
गौतमच्या हॉकी संघाची राज्यस्तरावर निवड; राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत करणार पुणे विभागाचे नेतृत्व
गौतमच्या हॉकी संघाची राज्यस्तरावर निवड; राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत करणार पुणे विभागाचे नेतृत्व
कोपरगाव विजय कापसे दि १४ सप्टेंबर २०२४:- सब-ज्युनिअर, जूनियर विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील मुला मुलींच्या एकूण २१ संघांनी सहभाग घेतला. गौतम पब्लिक स्कूलच्या ज्युनिअर हॉकी संघाने स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत अंतिम सामन्यात सोलापूर शहर संघाचा ६-० गोल फरकाने पराभव करून स्पर्धा जिंकत राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव. सौ चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख, क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाऊस मास्टर्स, स्पर्धेसाठी आलेले सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
गौतम पब्लिक स्कूलच्या जुनिअर हॉकी संघाने एकूण १५ वेळेस राज्यस्तरावर पुणे विभागाचे नेतृत्व करण्याचा विक्रम केल्यामुळे आमच्या हॉकी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक रमेश पटारे, प्राचार्य नूर शेख यांचा आम्हास अभिमान असून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवल्याबद्दल संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी समाधान व्यक्त केले. मुलींच्या गटात ज्युनियर नेहरू हॉकी स्पर्धा अहमदनगर ग्रामीण संघाने पुणे ग्रामीण संघाचा पेनल्टी स्ट्रोक मध्ये १-० ने पराभव करत जिंकली.
सदर विभागीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेकरिता शाळेत दाखल झालेल्या मुला-मुलींच्या संघांची राहण्याची उत्तम व्यवस्था संस्था सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे. दरवर्षी शाळेमध्ये विविध खेळांच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.गौतम पब्लिक स्कूलच्या विजयी ज्युनियर हॉकी संघाचे संस्थेचे चेअरमन अशोकराव काळे, संस्था विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.