डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते शहर व ग्रामीण भागात विविध गणपती मंडळाच्या आरत्या
गणेश उत्सवामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर प्रतिनिधी दि १४ सप्टेंबर २०२४– यावर्षी राज्यासह तालुक्यात समाधानकारक पाऊस असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर शहर व ग्रामीण भागातही मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा होत असून विविध गणेश मंडळाच्या आरतींना युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी भेट देऊन युवकांचा आनंद द्विगुणीत केला आहे.
कॅन्सर तज्ञ व युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी संगमनेर शहरात विविध मंडळांना तसेच ग्रामीण भागातील विविध गावांमधील गणेश मंडळाने भेटी दिल्या आहेत.काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका हे विकासाचे मॉडेल ठरले आहे. सहकार, शिक्षण,ग्रामीण विकास, शेती, दुग्ध व्यवसाय यातून संगमनेर तालुक्यात भरभराट निर्माण झाली असून बाजारपेठही फुलली आहे.
संगमनेर ही अहमदनगर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी ठरत असून अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. याचबरोबर शहरात मोठ्या संख्येने असलेल्या गणेश मंडळांनी अत्यंत सुंदर आरस उभे केले आहेत .हे आरस पाहण्यासाठी ग्रामीण भागासह जवळील तालुक्यांमधील नागरिकही मोठ्या संख्येने शहरांमध्ये दाखल होत आहेत. आकर्षक सजावट,लाइटिं,ग सुंदर देखावे हे यावर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाले की, आपला देश हा विविध संस्कृती आणि परंपरा सांगणारा आहे. गणेश उत्सवामुळे सर्वजण एकत्र येतात. अनेकांना सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे व्यासपीठ मिळते. यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक होत असून सर्वांनी एकत्र येऊन याचा आनंद घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, यांनीही अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या असून ते शनिवार रविवार रोजी शहर व तालुक्यात गणेश मंडळांच्या आरत्यांना उपस्थित राहणार आहेत. मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख यांनीही तालुक्यातील विविध गणेश मंडळाच्या आरत्यांना भेटू देऊन युवकांच्या आनंद वाढवला आहे.