सर्वच पाझर तलाव, बंधारे,ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून द्या; कार्यतत्पर आ. आशुतोष काळेंनी फिरविले निळवंडे कालव्याचे चाक
सर्वच पाझर तलाव, बंधारे,ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून द्या; कार्यतत्पर आ. आशुतोष काळेंनी फिरविले निळवंडे कालव्याचे चाक
सर्वच पाझर तलाव, बंधारे,ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून द्या; कार्यतत्पर आ. आशुतोष काळेंनी फिरविले निळवंडे कालव्याचे चाक
कोपरगाव विजय कापसे दि १४ सप्टेंबर २०२४ :- कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यातून नियमित पाणी मिळावे व नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतात. त्यामुळे निळवंडेचे ओव्हर फ्लोचे पाण्यातून जिरायती गावातील सर्वच पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून द्या. तुम्हाला अडचण आल्यास जेसीबी व इतर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मला सांगा. मात्र जोपर्यंत जिरायती गावातील सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरले जात नाही तोपर्यंत निळवंडे कालवे बंद करू नका अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
निळवंडेचे ओव्हर फ्लोचे पाणी निळवंडे डाव्या कालव्याच्या ६५ कि.मी. पासून सुरु होणाऱ्या तळेगाव कालवा शाखेतून जिरायती गावाला आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते निळवंडे कालव्याचे चाक फिरवून पाणी सोडण्यात आले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. ते म्हणाले की, अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील जिरायती गावांना निळवंडेचा मोठा आधार मिळाला आहे. यावर्षी जरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होवून धरणे पूर्ण क्षमतेने भरले असले तरी कोपरगाव मतदार संघात अद्यापही समाधानकारक पर्जन्यमान झालेले नाही. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप पिके जरी जोमात असली तरी मतदार संघातील विहीरींना अद्यापही पाणी उतरलेले नाही. हि परिस्थिती जिरायत भागात देखील वेगळी नाही.
त्यामुळे निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून या जिरायती गावांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याबरोबरच सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले भरल्यानंतर भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत जिरायती गावातील सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरले जात नाही तोपर्यंत निळवंडे कालवे बंद करू नका अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक वेळी आ. आशुतोष काळे स्वत: लक्ष घालून जिरायती गावातील नागरिकांना निळवंडे कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळावे यासाठी प्रयत्न करीत असून सर्व प्रकारची मदत करीत आहे. त्याबद्दल काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी,मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादाराबाद, तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले असून कार्यतत्पर आमदार कसा असावा याची नागरिकांना पुन्हा एकदा प्रचीती आली आहे.