कोल्हे गटविवेक कोल्हे

कोपरगाव मतदारसंघ हा स्वाभिमानी,जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल – विवेकभैय्या कोल्हे 

कोपरगाव मतदारसंघ हा स्वाभिमानी,जनताच विरोधकांना योग्य उत्तर देईल – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगांवचे पाणी घालविणाऱ्या विरोधकांचे पाप मिटणार नाही-विवेकभैय्या कोल्हे
आमदार काळे यांची अवस्था चावी दिलेल्या बाहुल्यासारखी’ 
कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४उर्ध्व गोदावरी खोरे अगोदरच तुटीचे आहे, वाढत्या शहरीकरणाबरोबरच दारणा गंगापूर धरण समूहात बिगरसिंचन पाण्यांचे आरक्षण वाढत असतांना माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या राजकीय जीवनांत पाण्यासाठी संघर्ष करून बारमाही गोदावरी कालव्यांना पाणी मिळविले. सोनेवाडी परिसरात होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले व एमआयडीसी मंजूर करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेतली.त्याचे पाण्याचे धोरण आखून पुढील काम अपेक्षित होते. सध्या दारणा समुहावर पाण्याचे नियोजन व धोरण न पाहिल्याने व अभ्यास नसल्याने त्यांना ते करता आले नाही. परिणामी गोदावरी उजव्या कालव्यावरील शेतीच्या पाण्याचे नियोजन ढासळले जाईल व गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांना त्याची झळ बसणार आहे.यामुळे आपल्याकडे शेती पाण्याची तूट होवून आवर्तन कमी होण्याचा धोका वाढला आहे.शेजारच्या येवला तालुक्यातील ४० गावांच्या पिण्यांच्या पाण्याचेही २.६८ दलघमी आरक्षण दारणेवरच टाकले तेंव्हाही आमदार गप्पच राहिले, विरोधक सध्या असत्याची चादर पांघरून बसले आहे ती फाडून सत्याचा उजेड पाडण्याचा संकल्प करू व योग्य वेळी समाचार घेवुन सत्य उजेडात आणु.

जाहिरात
मात्र आपल्या आमदारांनी या आरक्षणावर विधीमंडळात चकार शब्द काढला नाही, तेंव्हा या शेती उध्दवस्त करणाऱ्या आमदारांचा आपण निषेध करतो अशा शब्दात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी विरोधकांनी केलेल्या टिकेचा खरपुस समाचार घेतला.
विजयादशमीनिमित्त संवाद साधताना विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात आळंदी, वाघाड, पालखेड, काश्यपी, गौतमी, वालदेवी, मुकणे, भाम, मुकणे उंचीवाढ, निळवंडे, भावली, वाकी आदि धरणे बांधुन शेती सिंचनाबरोबरच औद्योगिकीकरणालाही पाणी मिळविले,पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या कामाला मंजुरी मिळवत मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत त्याचे कामही सुरू झाले आहे ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत आहेत, उलट त्यांच्याच कामाचा हिशोब ते मागत आहे हे बरोबर नाही.

जाहिरात
समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप विरोधकांनी केले.तीन हजार कोटी विकासाच्या गप्पा ते मारत आहे पण मतदार संघातील रस्ते, आरोग्य, पाणी, वीज याबरोबरच मुलभूत समस्यांची वाट लागली आहे, कामे कमी अन प्रसिध्दीच जास्त हाच उद्योग सुरू आहे.
 संजीवनी नोकरी महोत्सवमुळे धडकी विरोधकांना बसली आहे, तालुक्याची स्मार्टसिटी विरोधकांनीच घालवली तरीही ते आमच्यावर व्यक्तीद्वेषातुन उठसुठ टिका करत आहेत, आमच्यावर टिका केल्याशिवाय त्यांना काहीच साध्य होत नाही.कोपरगांव शहराबरोबरच मतदारसंघात गुन्हेगारी वाढली आहे. भ्रष्ट्राचार अमाप वाढला आहे,विकास झाला असा दावा करणाऱ्या विरोधकांनी जवळच्या चार दोन बगलबच्च्यांचा विकास केला आहे. काळे कुटुंबातील ज्येष्ठांचा आदरपूर्वक उल्लेख करतो कारण आणि चाकोरी सोडून टीका करणारे नाही,स्व.कोल्हे साहेबांवर बोलण्याआधी विरोधकांनी आपली राजकीय उंची बघावी अन्यथा मलाही खूप काही बोलता येईल असा इशारा आमदार काळे यांना दिला आहे.

जाहिरात मुक्त
स्व.कोल्हे साहेब यांनी काय केले विचारणाऱ्या आमदारांनी कोपरगांव शहराच्या पाच नंबर साठवण तलावाचा जो गाजावाजा ते करत आहे त्याची व पाचही तळ्याची जमीन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना दुरदृष्टी होती म्हणूनच त्यांनी कोपरगांव नगरपालिकेला घेवुन दिली याचाही अभ्यास त्यांनी करावा. त्यांच्या कार्यकर्त्यांना कुणी विचारले तर ते ही सत्य मान्य करतात हे त्यांना ठाऊक नसेल.मा.अशोकराव काळे यांनी घेतलेले धोरण मतदारसंघ मागे नेणारे होते तीच पुनरावृत्ती विद्यमान आमदारांनी केली आहे.चावी दिलेल्या बाहुल्यासारखे आमदार काळे हे स्वतःच्या उपजत कृतीने वागत नाही तर त्यांना एजंसी चालवते अशी बोचरी टीका काळे यांना टोला लगावताना केली आहे.
संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातुन आम्ही पुढच्या पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत, संजीवनी बीपीओ कॉल सेंटर मार्फत हजारो तरूणांना कोट्यावधीचे रोजगार दहा वर्षात निर्माण केले. कोपरगांव तालुका हा स्वाभीमानी आहे, शब्दरूपी विश्वासाचे सोने देऊन ग्वाही देतो की कोपरगावचे गतवैभव पुन्हा मिळवुन देवु असे सांगुन विवेकभैय्या कोल्हे यांनी विजयादशमीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. 
 सोनं पण बेन्टेक्सचं 
            माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शंभर नंबरी चोवीस कॅरेट सोन्यासारखी कार्यकर्त्यांची खाण निर्माण केली पण विरोधकांच सोनं बेन्टेक्सच आहे त्याची पोलखोल लवकरच करू असे विवेकभैय्या  कोल्हे म्हणताच उपस्थितांनी त्यास दाद दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे