आमदार आशुतोष काळेकाळे गट

शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार-  आ. आशुतोष काळे

शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना घरकुलांसाठी विनामुल्य मिळणार-  आ. आशुतोष काळे

संवत्सर, कोकमठाण, जळगाव, पुणतांबा, वाकडीला फायदा

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४ :- कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होते परंतु स्वत:ची जागा नसल्यामुळे हे पात्र लाभार्थी घरकुलाचा लाभ घेवू शकत नव्हते तर एलमवाडी सारख्या गावात जागा नसल्यामुळे स्मशानभूमी सुद्धा नव्हती. ह्या जागेच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून शेती महामंडळाच्या जमिनी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी मिळणार असून संवत्सर, कोकमठाण, जळगाव, वाकडी आदी गावांना फायदा होणार आहे. त्याबद्दल संवत्सर, कोकमठाण, जळगाव, वाकडी आदी गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

कोपरगाव मतदार संघात असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनी उपयोगात आणून त्या जमिनी स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तसेच ज्या ज्या गावात पाणी पुरवठा योजना, साठवण तलाव, स्मशान भूमी अशा सार्वजनिक कामांसाठी कशा मिळविता येतील याबाबत आ.आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरु होता. अनेक ठिकाणी शेकडो एकर जमीन पडीत आहे. शेती महामंडळ बंद पडल्यामुळे या जमिनी पडीत होत्या या जमिनींचा लगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी उपयोगात आणल्यास साठवण तलाव, गावतळे, पाझर तलाव यांची निर्मिती करून पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो. या जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून उपलब्ध झाल्यास या जमिनीवर साठवण तलाव, गावतळे, पाझर तलावांची निर्मिती करून हे स्त्रोत गोदावरी कालव्याच्या प्रत्येक आवर्तनातून भरून घेवून पाणी प्रश्न सोडविण्या बरोबरच आसपास असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिर व कूपनलिकांना त्याचा फायदा होवू शकतो. या उद्देशातून आ. आशुतोष काळे यांनी निवडून येताच २०२० मध्ये शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून कशा प्रकारे शेती महामंडळाच्या जमिनी जागा नसलेल्या घरकुल लाभार्थ्यांना व मतदार संघातील ग्रामपंचायतींना मिळवून देता येतील याबाबत चाचपणी करून पाठपुरावा सुरु केला होता.

जाहिरात

त्या पाठपुराव्यातून शेती महामंडळाने जमिनी देण्यासाठी सहमती दिली मात्र सदरच्या जमिनीची चालू बाजारभाव प्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने केलेली मागणी ग्रामपंचातीच्या आवाक्याबाहेर होती त्याप्रमाणे स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेले लाभार्थी देखील जमिनीचे बाजार मूल्य शेती महामंडळाला देवू शकत नव्हते. त्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शेती महामंडळाच्या जमीनी स्वत:ची जागा नसलेल्या घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना तसेच ज्या ज्या गावात पाणी पुरवठा योजना, साठवण तलाव, स्मशान भूमी अशा सार्वजनिक कामांसाठी विनामुल्य मिळाव्यात यासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून शेती महामंडळाच्या जमिनी घरकुलासाठी गरजू लाभार्थ्यांना तसेच सार्वजनिक कामासाठी ग्रामपंचायतींना विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा कोपरगाव मतदार संघातील संवत्सर, कोकमठाण, जळगाव, वाकडी आदी गावांना फायदा होणार असून या गावातील नागरिकांच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

शेती महामंडळाचे कामगार मागील तीन पिढ्यापासून विविध गावात राहत होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या. एलमवाडी सारख्या गावात तर ग्रामपंचायत मालकीची स्वत:ची जागा नसल्यामुळे स्मशानभूमी नव्हती. परंतु आमदार आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून शेती महामंडळाची जागा उपलब्ध होऊन एलमवाडी स्मशानभूमी होवू शकली. तसेच घरकुलासाठी ज्या कर्मचाऱ्यांना स्वतःची जागा नाही त्यांना दोन गुंठे जागा विनामुल्य देण्याचा निर्णय ऐतिहासिक असून त्यामुळे मागील पन्नास वर्षांचा प्रश्न मार्गी लागला असून आ.आशुतोष काळे यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहेच परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे.

-शिवाजीराव साबदे (सरपंच जळगाव)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे