आमदार आशुतोष काळेकाळे गट

बालसंगोपन’ योजनेतील लाभार्थ्यांना आ. आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

बालसंगोपन’ योजनेतील लाभार्थ्यांना आ. आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

बालसंगोपन’ योजनेतील लाभार्थ्यांना आ. आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४अनाथ, एकपालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जात आहे. ज्याप्रमाणे राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यात आ.आशुतोष काळे आघाडीवर आहेत त्याप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा देखील लाभ मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मदतीचा हात देतांना अहिल्यानगरला जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करून देवून सर्व सामान्य जनतेचा कामदार आमदार असल्याचे आ.काळे यांनी पुन्हा एकदा जनसेवेतून सिद्ध केले आहे.

जाहिरात

विकासाच्या बाबतीत अव्वल असणारे आ. आशुतोष काळे समाज सेवेत देखील पुढे आहेत.मतदार संघातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कोपरगाव-अहिल्यानगर बससेवा उपलब्ध करून दिल्यामुळे आजवर हजारो दिव्यांगाना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबिविण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत परिस्थितीमुळे अनाथपण आलेल्या बालकांना प्रत्येक गरजवंताला लाभ मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यामुळे  बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर आवश्यक कागद पत्रांची पूर्तता करून पात्र लाभधारक स्वत: हजर असावे लागते.

जाहिरात

त्यासाठी प्रत्येक लाभार्थी हा त्याच्या सोयीनुसार जाऊ शकत नाही व त्याला त्याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अडचणी येवू शकतात हि अडचण लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेवून मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोपरगाव येथुन अहिल्यानगरला जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे जवळपास १०० लाभार्थ्यांच्या अडचणी दुर होवून त्यांचा आर्थिक भार आ.आशुतोष काळे यांच्यामुळे कमी झाला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे