आपला जिल्हा

आदिती एंटरप्राइजेस युटीएल सोलर शोरूम चे कोपरगावात दिमाखात उद्घाटन 

आदिती एंटरप्राइजेस युटीएल सोलर शोरूम चे कोपरगावात दिमाखात उद्घाटन

आदिती एंटरप्राइजेस युटीएल सोलर शोरूम चे कोपरगावात दिमाखात उद्घाटन 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२४कोपरगाव येथे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या पवित्र दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव येथील जपे हॉस्पिटल शेजारील आढाव कॉम्प्लेक्स मध्ये कोपरगाव येथील राजेंद्र पानगव्हाने, वाल्मीक पानव्हाणे, प्रणव पानगव्हाणे व धनंजय साबळे यांच्या अत्याधुनिक अशा अदिती एंटरप्राईजेस च्या  युटीएल सोलर एक्सक्लुझिव शोरूमचे राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

जाहिरात
सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असून सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात सौरवर चालणाऱ्या उपकरणांचा खप वाढला असून मागणी देखील वाढली आहे यामुळे पर्यावरण देखील संतुलित राहण्यास मदत होत आहे. याच उद्देशाने कोपरगाव येथे पानगव्हाने परिवाराने प्रसिद्ध युटीएल या सोलर कंपनीसोबत करार करत आदिती एंटरप्राईजेस नावाने कोपरगाव शहरात यूटीएल  सोलर एक्सक्लिझिव शोरूम दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सामान्य घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसह सेवेत दाखल झाले आहे.
या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे, कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पगार, यूटीएल या सोलर कंपनीचे रीजनल सेल्स मॅनेजर ललित रजपूत, महावितरण कोपरगाव शहर अतिरिक्त अभियंता धनंजय धांडे, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण लक्ष्मण राठोड,स्व. सूर्यभान पाटील वहाडणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस के जाधव, गौतम सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घेमुड साहेब, प्रसिद्ध डॉक्टर शेखर फडके आदी मान्यवरांनी या अत्याधुनिक शोरूमला भेट देत पानगव्हाने परिवाराला शुभेच्छा व्यक्त करत सोलर विषयी माहिती जाणून घेतली या प्रसंगी सर्व मान्यवरांचा आदिती एंटरप्राईजेस च्या वतीने स्वागत करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास अनिल भास्कर, हेमंत वानखेडकर, विजय घोगरे, भरत आढाव, राजेंद्र क्षत्रिय, चेतन गाढवे, सागर सुराळकर, सचिन कोताडे, अक्षय सरोवर, सुभाष दरेकर, ऋषिकेश कासार, विशाल कासार, सचिन कदम, नंदकुमार कदम आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे