आपला जिल्हा
जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा – भोजडे येथे जातीचे दाखले वाटप व रक्षाबंधन साजरे
जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा – भोजडे येथे जातीचे दाखले वाटप व रक्षाबंधन साजरे
जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा – भोजडे येथे जातीचे दाखले वाटप व रक्षाबंधन साजरे

कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२५–भोजडे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. वीर बिरसा मुंडा यांचे पूजन करून मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच आदिवासी बंधूंना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करत आहोत, तसेच मला आपण निमंत्रित केले याबद्दल मी आदिवासी बंधू-भगिनी तसेच युवकांचे मनापासून आभार मानते, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. तसेच वीर एकलव्य, वीर बिरसा मुंडा व तंट्या नाईक यांना नमन करून, वीरभद्र महाराजांच्या प्रांगणात होत असलेल्या या कार्यक्रमाला संबोधित केले.


कार्यक्रमाला त्र्यंबकभाऊ सरोदे, सुरेशभाऊ जाधव, ज्ञानेश्वर सिनगर, मुकुंद काळे, रंगनाथ सिनगर, साहेबराव सिनगर, प्रकाश गायकवाड, शामराव गिऱ्हे, देवराम मंचरे, संजय सिनगर, कैलास धट, संतोष चव्हाण, बाळासाहेब सिनगर, बाबासाहेब मंचरे, वाल्मीक बोर्डे, महेंद्र आहेर, शैलेश भाऊ सिनगर, भाऊसाहेब घनघाव, ढेपले सर, शहाराम सिनगर, भाऊसाहेब मोरे, अशोक मंचरे, पोलीस पाटील देवेश माळवदे, आदिवासींचे धडाडीचे कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे आदी मान्यवर तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
