कोपरगाव विधानसभेकरीता पहिल्याच दिवशी २७ इच्छुकांनी नेले ३९ अर्ज
कोपरगाव विधानसभेकरीता पहिल्याच दिवशी २७ इच्छुकांनी नेले ३९ अर्ज
कोपरगाव विधानसभेकरीता पहिल्याच दिवशी २७ इच्छुकांनी नेले ३९ अर्ज
कोपरगाव विजय कापसे दि २२ ऑक्टोबर २०२२– मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर करत मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी या निवडणूक प्रक्रियेची आदि सूचना जारी झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित अशा कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी आज पहिल्याच दिवशी मोठी लगबग कोपरगाव तहसील कार्यात पहावयास मिळत होती.
आज मंगळवारी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २७ इच्छुकांनी ३९ उमेदवारी अर्ज नेले असून यात संजय भास्करराव काळे (कोपरगाव २ अर्ज) आशुतोष अशोकराव काळे (कोपरगाव १ अर्ज) आशुतोष अशोकराव काळे (कोपरगाव १ अर्ज) प्रभाकर भाऊजी अहिरे (धामोरी २ अर्ज) किरण मधुकर चांदगुडे (चासनळी २ अर्ज) बाबुराव सावळेराम पवार (खडकी कोपरगाव १ अर्ज) दिलीप भाऊसाहेब गायकवाड (जेऊर कुंभारी २ अर्ज) विजय सुभाष भगत (कोपरगाव २ अर्ज) विजय सुधाकर जाधव (मुर्शतपूर २ अर्ज) राजेंद्र माधवराव कोल्हे (पोहेगाव २ अर्ज) प्रफुल्ल सोमनाथ शिंगाडे (कोपरगाव १ अर्ज) किसन शंकर सोनवणे (कारवाडी १ अर्ज) शिवाजी पोपटराव कवडे (कोकमठाण २ अर्ज) विजय नारायणराव वडांगळे (कोपरगाव १ अर्ज) दत्तू किसनराव भाटे (घोयेगाव २ अर्ज) शरद रंगनाथ ससाणे (कोपरगाव १ अर्ज) दिलीप चिंतामण लासुरे (माहेगाव देशमुख २ अर्ज) उत्तमराव रायभन चरमळ (पढेगाव २ अर्ज) प्रमोद भाऊसाहेब लबडे (माहेगाव देशमुख १ अर्ज) शिवाजी मुरलीधर ठाकरे (भोजडे १ अर्ज) महेश मोहनराव नवलपुरे (कोपरगाव अर्ज १) चंद्रहस आण्णासाहेब औताडे (पोहेगाव २ अर्ज) गौतम जयसिंग बनसोडे (कोपरगाव १ अर्ज ) संजय गोविंदराव शिंदे (करंजी १ अर्ज ) विश्वनाथ पांडुरंग वाघ (चितळी १ अर्ज) आकाश विठ्ठल काळे (माहेगाव देशमुख १ अर्ज) नवनाथ पांडुरंग वाघ (माहेगाव देशमुख १ अर्ज) यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
कोपरगाव विधानसभेचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून सर्वपरिचित असलेले गेल्या अनेक महिन्यापासून विधानसभेची तयारी करत असलेले युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने संपूर्ण राज्यात निवडणूकीची धामधूम सुरू असताना देखील संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मात्र शांतता आहे.