आपला जिल्हा

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने नेत्र बिंदू तपासणी व उपचार शिबीरास प्रारंभ 

जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने नेत्र बिंदू तपासणी व उपचार शिबीरास प्रारंभ 
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने नेत्र बिंदू तपासणी व उपचार शिबीरास प्रारंभ 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ ऑक्टोबर २०२४कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने व ठोळे उद्योग समुहाच्या मदतीने इंडोर गेम हाॅल जवळ रिकब शिंगी परिवाराच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या धर्मार्थ मोफत दवाखान्यात अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

जाहिरात
अहिल्या नगर येथील आनंद ऋषी नेत्रालयाचया सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अल्प दरात मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबीरास उद्योजक कैलासचंद ठोळे, रिकब शेठ शिंगी, मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी आदिंचौ उपस्थित करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक डॉ विलास आचारी, कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले. समारंभासाठी मंचचे ऊत्तम भाई शहा, बापुसाहेब ईनामके,  पेंटर महंमद दारुवाला, ह भ प साबळे महाराज यांच्यासह सभासद उपस्थित होते. आनंद ऋषी नेत्रालयाचया वतीने डॉ महेश गायके, सुशील गाडेकर, सागर देवकर, भाऊसाहेब आदमाने यांनी सहकार्य केले. नेत्र तपासणी साठी शहर व ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे