आपला जिल्हा

आर. जे. एस. फार्मसी महाविद्यालयाचा शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

आर. जे. एस. फार्मसी महाविद्यालयाचा शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

आर. जे. एस. फार्मसी महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची परंपरा कायम ठेवली
कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२५:- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बी फार्मसी महाविद्यालयाच्या बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी साक्षी मुंगसे,  जानवी जोशी आणि  तृप्ती शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे तसेच, महाविद्यालयाच्या बी. फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी घोरपडे साक्षी आणि  श्रुती गोसावी यांनी ई-पोस्टर सादरीकरणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

जाहिरात
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रगल्भ ज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान आणि शैक्षणिक गुणवत्ता प्रदान करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांचा आहे.हे यश प्रा.डॉ.उषा जैन, प्रा.प्रसन्ना दळवी  आणि प्रा.कावडे दादासाहेब सर यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.

जाहिरात
आर.जे.एस.फार्मसी महाविद्यालय हे शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनाभिमुख दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ओळखले जाते. अभ्यासक्रमाबरोबरच महाविद्यालयात सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रमांद्वारे सर्जनशीलता व टीमवर्क विकसित केले जाते. संवाद कौशल्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांना जागतिक संधींसाठी तयार करते. एनपीटीईएल ब्रिज कोर्सेस विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान अधिक भक्कम करून उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करतात. आधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अनुभवी प्राध्यापक वर्गामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो.

जाहिरात
हे यश महाविद्यालयाच्या त्या ध्येयाची प्रचीती देणारे आहे, ज्यामध्ये सक्षम, जबाबदार आणि उद्योगसिद्ध औषधशास्त्र व्यावसायिक घडवण्याचा संकल्प प्राचार्य डॉ. नितीन जैन सरांचा आहे.आर.जे.एस.फाउंडेशनचे सचिव  प्रसाद जी कातकडे, विजयजी कडू,  दीपक कोटमे, संचालक  प्रणित कातकडे प्राध्यापकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. असून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्यातील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर्स स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी यांच्याकडून घेण्यात आली, तर राज्यस्तरीय इ पोस्टर स्पर्धा मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येवला यांच्याकडून घेण्यात आली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे