कोपरगाव महायुतीचा उमेदवार पन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास – साहेबराव रोहोम
कोपरगाव महायुतीचा उमेदवार पन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास – साहेबराव रोहोम
कोपरगाव महायुतीचा उमेदवार पन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास – साहेबराव रोहोम
कोपरगाव विजय कापसे दि २३ नोव्हेंबर २०२४– भाजपा राष्ट्रवादी शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांचा विजय पन्नास हजार हून अधिक मताधिक्याने होईल असा विश्वास भाजपा माजी तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील महायुतीचा धर्म मतदारसंघात कोल्हे कुटुंबाने पालन करत आम्हाला दिलेल्या सुचनेनुसार तळागाळात असणारे मजबूत संघटन अधिकाधिक मतदान खेचण्यात यशस्वी झाले आहे. बिपीनदादा कोल्हे,सौ.स्नेहलताताई कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी केलेली चर्चा व त्यानंतर झालेली सर्व निवडणूक प्रक्रिया वेगवान होती.कोल्हे कुटुंबाचा आदेश स्वीकारून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी युतीधर्म पाळत अगदी एक बूथ तीस युथ सारखे मजबूत संघटन असल्यामुळे आशुतोष काळे यांना मोठे मताधिक्य देणे शक्य झाले आहे.
विश्वासार्ह राजकारण हा कोल्हे कुटुंबाचा पिंड आहे.त्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून एकदिलाने सर्व महायुतीच्या प्रचार प्रक्रियेला गती देण्यासाठी व्यक्तीसंपर्क मोठा भाग होता. अनेक गावात पक्षाचे निरीक्षकांनी बैठका घेत कोल्हे कुटुंबाच्या मार्गदर्शनाने केलेले सूक्ष्म नियोजन केवळ विजयच नाही तर मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सक्रिय राहिला त्याबद्दल सर्व महायुतीच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे अभिनंदन व सामूहिक संघटनाने झालेल्या मोठ्या विजयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रोहोम यांनी दिल्या.