आमदार आशुतोष काळे

७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ; उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे-आ.आशुतोष काळे

७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ; उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे-आ.आशुतोष काळे

७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ; उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे-आ.आशुतोष काळे

आभार जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ नोव्हेंबर २०२४पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांचे रब्बी हंगाम २०२४-२५ साठी ७ नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना ०५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले ७ नंबर पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात देवकर

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम २०२४-२५ साठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येवून  रब्बी हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार १४ नोव्हेंबर पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते. परंतु हि मुदत संपल्यामुळे काही लाभधारक शेतकरी मात्र आपले अर्ज मुदतीच्या आत दाखल करू शकले नाहीत.त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना केल्या होत्या.त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून ०५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जाहिरात पहाडे

                त्यामुळे अजूनही जे लाभधारक शेतकरी आपला पाणी मागणी अर्ज दाखल करू शकले अशा शेतकऱ्यांनी आपले अर्ज सबंधित विभागाकडे तातडीने दाखल करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात लकारे
जाहिरात लहिरे
जाहिरात निखाडे
जाहिरात जगताप
जाहिरात म्हस्के
जाहिरात जोशी
जाहिरात गुंजाळ

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे