आपला जिल्हा

के बी पी विद्यालयात बीपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

के बी पी विद्यालयात बीपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
के बी पी विद्यालयात बीपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ जुलै २०२५संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त , रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  बिपीनदादा कोल्हे  यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना १५०० वह्यांचे वाटप करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष  दिलीप दारुणकर, मा.उपनगराध्यक्ष विजयराव वाजे, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी वैभव आढाव, बाळासाहेब नरोडे, सुरेश बोळीज सर सदस्य जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, रुपेश सिनगर , जगदीश मोरे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष कोपरगाव, समीर सुपेकर, बाळासाहेब रुईकर,  अंबादास वडांगळे   आदींची उपस्थिती वाटप करण्यात आले.

जाहिरात
या कार्यक्रमाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक  लव्हाटे के.डी. यांनी प्रास्ताविक करत विद्यालय राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली तर सुरेश बोळीज सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच  वैभव आढाव हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी बोलताना  सांगितले की मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप दारुणकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
यावेळी उपमुख्याध्यापक  कोल्हे बी. के., प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लंके सर, नगरसेवक राजेंद्र पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख  चव्हाण एस. एस. आदी सेहवसर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच, कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आरोटे एस बी यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे