संगमनेर

जनतेचे प्रेम हीच मोठी ताकद – बाळासाहेब थोरात  आपसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र या

जनतेचे प्रेम हीच मोठी ताकद – बाळासाहेब थोरात
आपसातील मतभेद विसरून विकासासाठी एकत्र या

मंगळापुर येथील नागरिकांशी साधला संवाद

संगमनेर विजय कापसे दि ४ डिसेंबर २०२४चाळीस वर्षाच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे. येथील सहकारी संस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था, बाजारपेठ चांगली आहे.चांगले वातावरण आणि चांगली संस्कृती निर्माण झाली आहे. यावर आता आक्रमणे होतील. ते थांबवण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र या असे आवाहन करताना जनतेचे प्रेम हीच मोठी ताकद असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

मंगळापूर येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते याप्रसंगी कारखान्याचे संचालक रोहिदास पवार, वसंत पवार, भानुदास गोरे, संजय वाळे सर, सावित्रा वाळे, दादा पाटील वाळे, उपसरपंच लक्ष्मण भोकनळ, पंडित वैराळ, उत्तमराव पवार,सुनील पवार,माधव वाळे, पंढरी वाळे,गोपीनाथ वाळे,बाधशा पवार,अर्जुन वाळे,रवी पवार, रामदास दिघे, निवृत्ती वाळे,लहानू वाळे,शिवाजी गोसावी,किरण वाळे,केलास वाळे,राहुल पवार,प्रदीप वाळे,संभाजी वाळे,अमोल भोकनळ,गोकुळ पवार,विशाल वाळे आदींसह गावातील सर्व कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, तालुक्यातील जनतेने सदैव आपल्यावर प्रेम केले. यामध्ये मंगळापुर गावाने सातत्याने मताधिक्य दिले आहे. शेतकरी परिवारातील आपण सर्वजण सातत्याने मोठे कष्ट करतो. संगमनेर तालुक्यामध्ये दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. यामुळे तालुक्यात अर्थव्यवस्था मजबूत आहे. विविध बँकांमधून सुमारे आठ हजार कोटींचे डिपॉझिट आहे. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे.शिक्षण व्यवस्था चांगली आहे.

जाहिरात

राजकारण हे गरिबातल्या गरीब व सर्व तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण सातत्याने केले. एक राजकारणाची आदर्श संस्कृती निर्माण केली हे सर्व टिकले पाहिजे. राज्य पातळीवर विविध मंत्रिपदाची संधी मिळाली याचा उपयोग तालुक्याच्या विकासाकरता आपण केला.एक तालुका एक परिवार ही संकल्पना निर्माण केली. जातीभेदाचे राजकारण करून काही लोकांनी द्वेष पसरविला. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. मानवता धर्म कायम जोपासला आहे.

दंगलीचे शहर असलेले संगमनेर शांतता आणि वैभवशाली शहर झाले. यामागे कष्ट आहेत. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण पूर्ण केले. कालवे पूर्ण केले. त्यातून अजून समृद्धी निर्माण होईल. ही विकासाची वाटचाल जपण्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे.

आगामी काळामध्ये सहकारी संस्थांवर हल्ला होऊ शकतो. याचबरोबर तालुक्याचे पाणी पळवले जाऊ शकते या चिंतेच्या बाबी आहेत. पण जनतेचे प्रेम आपल्या सोबत आहे. आणि ती मोठी ताकद असल्याने आपण लढू मात्र आता स्थानिक नागरिकांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गावातील विविध नागरिकांनी आमदार थोरात यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी ज्येष्ठ तरुण व गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे