बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या रामनाथ गुरुकुले यांच्या कुटुंबीयांचे डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडून सांत्वन
बिबट्यांचे मानवी वस्तीतील वाढते हल्ले चिंताजनक : शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात – डॉ.थोरात
संगमनेर विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२४– सावरगाव तळ येथील रामनाथ सूर्यभान गुरुकुले यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यातून ते मृत पावले आहे. दिवसेंदिवस मानवी वस्तीत बिबट्यांच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने ताबडतोब उपाययोजना केल्या पाहिजेत. मयत गुरुकुले कुटुंबाच्या पाठीशी लोकनेते बाळासाहेब थोरात हे सदैव उभे असून या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.
सावरगाव तळ व चंदनापुरी मधील शिरतार वस्तीवर राहणाऱ्या गुरुकुले कुटुंबीयांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी विजय राहणे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चंदनापुरी मधील ढग्या डोंगराजवळ रामनाथ गुरुकुले याच्यावर बिबट्याने हल्ला केला व या हल्ल्यामध्ये ते मृत्यू झाले. यावेळी त्यांचे वय अवघे 34 वर्षांचे होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. याप्रसंगी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, बिबट्यांचे मानवी वस्तीतील हल्ले दिवसेंदिवस वाढले आहे. यामुळे या परिसरात भीतीदायक वातावरण आहे. यापूर्वीही तीन मृत्यू या हल्ल्यातून झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मोठ्या जनसमुदायासमोर तत्कालीन वनमंत्र्यांनी याबाबत आश्वासित केले होते. मात्र अजूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व वन विभाग वन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेत तातडीने जास्तीत जास्त मदत मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिल्या.
याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात लोकनेते बाळासाहेब थोरात हे कुटुंब प्रमुख म्हणून सदैव पाठीशी आहेत. त्यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळून दिली जाईल यासाठी आपण स्वतः काम करू असे त्या म्हणाल्या. डॉ.जयश्रीताई थोरात यांनी अत्यंत आस्थेवायिकपणे आणि आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे गुरुकुले कुटुंब व सावरगाव तळ मधील नागरिक भारावून गेले.