नवीन वर्ष २०२५ मध्ये प्रत्येकाची संकल्प पूर्ती व्हावी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
नवीन वर्ष २०२५ मध्ये प्रत्येकाची संकल्प पूर्ती व्हावी – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२४– भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष आशा आणि ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे येणारे नवीन वर्ष २०२५ हे प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे, सुख समृद्धीचे जाऊन नवीन वर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी अशा शुभेच्छा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माझी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून त्यावर भविष्याची वाटचाल ही ठरलेली असते. नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला चांगले आरोग्याबरोबर चांगले जीवनमान मिळावे यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे असून प्रत्येकाने एक चांगला संकल्प करून सामाजिक बांधिलकी ठेवत संविधानाचा विचार जपत राष्ट्रहितासाठी काम करावे. येणारे वर्ष हे सर्वांना आनंददायी जावो अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
२०२५ वर्षात सुदृढ व निरोगी समाज निर्मितीसाठी काम व्हावे – मा.आ.डॉ.तांबे
आगामी २०२५ या नवीन वर्षात प्रत्येकाच्या हातून देश बांधवांच्या विकासाबरोबर राष्ट्रहिताचे काम व्हावे प्रत्येक नागरिकास समृद्ध आरोग्य आनंदी जीवनाबरोबर ही वर्ष यशस्वी जावो नवीन वर्षात प्रत्येकाने चांगला संकल्प करून सकारात्मक व पुरोगामी विचार वाढीस लावावा आणि सुदृढ व निरोगी समाज निर्मितीसाठी काम करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या
२०२५ मध्ये प्रत्येकास आरोग्य समृद्धी लाभावी – डॉ.जयश्रीताई थोरात
धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र येणाऱ्या वर्षांमध्ये प्रत्येकाला आनंदी जीवनासाठी आरोग्य समृद्धी लाभावी याचबरोबर युवकांच्या हातून रचनात्मक कार्य उभे राहावे अशा अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी नवीन वर्षाच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत.