एस एस जी एम कॉलेज

एस.एस.जी.एम.कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

एस.एस.जी.एम.कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

एस.एस.जी.एम.कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ३ जानेवारी २०२४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ ते रविवार दि १२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील रवंदे या गावी सदर कालावधीमध्ये ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ ही संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी सांगितले.

जाहिरात

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे कार्यक्षम आमदार  आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  बाळासाहेब कदम हे लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व  महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड भगीरथ शिंदे, चैतालीताई काळे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती)  अॅड. संदीप वर्पे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती),  सुनील गंगुले(सदस्य, महाविद्यालय विकास समिती),  अरुण चंद्रे (सदस्य,जनरल बॉडी), अशोकराव मुरलीधर काळे (अध्यक्ष ,तंटा मुक्ती समिती रवंदे),  अनिल बाळासाहेब कदम (सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे स.सा.कारखाना), शोभा भवर (सरपंच रवंदे)   ऋषिकेश कदम (उपसरपंच रवंदे) आदी उपस्थित राहणार आहे.

जाहिरात

या शिबिरामध्ये श्रमसंस्काराबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून ‘ मृदा व जल व्यवस्थापन काळाची गरज’, ‘मी गोदावरी बोलते’, ‘ बालविवाह कायदेशीर गुन्हा’, ‘अक्षय ऊर्जा संवर्धन’, ‘स्वच्छता व आरोग्य’ यांसारख्या  व्याख्यानांचे आयोजित करण्यात येणार असल्याचे  राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी सांगितले.

कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे