आपला जिल्हा

तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात आयुष बत्तासे तालुक्यात दुसरा

तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात आयुष बत्तासे तालुक्यात दुसरा

तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात आयुष बत्तासे तालुक्यात दुसरा

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ११ जानेवारी २०२५कोपरगाव तालुका गणित व विज्ञान ५२ व्या प्रदर्शन मंगळवार दि ७ जानेवारी २०२५ ते बुधवार दि ८ जानेवारी २०२५ दरम्यान कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते आ आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.

जाहिरात

 

या प्रदर्शनात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर सुरेगाव या विद्यालयाने गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते यामध्ये इयत्ता १ ली ते ५ वी विज्ञान गटात द्वितीय क्रमांक आयुष गणेश बत्तासे याने ग्रास हार्वेस्टिंग मॉडेल हे उपकरण सादर करत या गटात तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला.

जाहिरात

या गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये इ.१ली ते ५वी इ ६वी ते ८वी.व इ ९वी ते १२वी.असे तीन गट निहाय तब्बल २०० उपकरणे ठेवण्यात आले होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य  राजेश परजणे, कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी, विज्ञान अध्यापकाचे अध्यक्ष योगेश सावळा, उपाध्यक्ष रमेश हिंगे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक आर आर पाचोरे , के व्ही वसावे जगताप सर यांच्या हस्ते तसेच प्रमुख उपस्थितीत आयुष बत्तासे याचा प्रमाणपत्र व विजयी करंडक देऊन सन्मान करण्यात आला.

जाहिरात

 

आयुषच्या या यशाबद्दल तसेच सर्व सहभागी विद्यार्थांचे माजी आमदार  अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे,स्थानिक स्कुल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सदस्य तसेच सर्व पालकांनी कौतुक करत मार्गदर्शक मुख्याध्यापक आर आर पाचोरे, जे आर बैरागी, के व्ही वसावे, जगताप सर,ए जी भगुरे,जे यु खंबायत, जेष्ठ शिक्षक आर के शिंदे, एस के थोरात, एस एस राऊत, कुर्हाडे मॅडम. यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी उपस्थिती व्याख्याते अमोल चिने , विस्तार अधिकारी, शेवंता पुजारी, केंद्रप्रमुख, भारती शेळके, विलास भांड, बाबाजी इराळे, बाबासाहेब महानुभव, रावसाहेब लांडे, तोरवणे साहेब, दहिफळे सर, साबळे सर ,दिघे सर , मुख्याध्यापक देशमुख सर, पाचोरे सर, मोरे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ , गणित व विज्ञान अध्यापक संघाचे समितीचे सदस्य, पवार सर, गोसावी सर, बोडखे सर, गायकवाड सर, हिंगे सर , सलामे सर , सचिन कडू सर , वडवी डी एम, गायकवाड सर, दिलीपराव बोरणारे, गोवर्धन परजणे, सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मधुकर साबळे, सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे, , कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पंडितराव वाघीरे, गट सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, सुरेश वाबळे सर ,मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांचे आभार विज्ञान अध्यापक संघाचे प्रमुख योगेश सावळा यांनी मांनले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे