स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान–खासदार शाहू महाराज
विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये- विजय वडेट्टीवार
राजेश टोपे, डॉ रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव
यशोधन जवळील मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते .तर व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले ,माजी आमदार मोहन दादा जोशी ,ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,रणजीत सिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, सौ प्रभावती ताई घोगरे ,दशरथ सावंत , मधुकरराव नवले ,राजवर्धन थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. शाहू महाराज म्हणाले की, भाऊसाहेब थोरात आणि डॉ.आण्णासाहेब शिंदे यांचा वारसा बाळासाहेब थोरात यांनी समर्थपणे जपला आहे. भाऊसाहेबांनी सहकारातून तालुका समृद्ध केला तर अण्णासाहेबांनी देशात हरितक्रांती आणली. हे चांगले दिवस त्यांच्यामुळे आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार पाहून आनंद झाला. राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. अपघात झाला असेल परंतु त्यातून सावरून कार्यकर्त्यांनी तालुका सांभाळावा. कारण बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे सध्याच्या राजकारणात दुर्मिळ आहे. चांगल्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या नेतृत्वाला ताकद द्या असे ते म्हणाले
तर विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन विभूतींच्या महान कार्यातून हा परिसर उभा राहिला आहे. राज्यातील पहिल्या विकसित तीन तालुक्यांमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याचा समावेश आहे. जय पराजय होत असतात. येणारे दिवस आपलेच असतील. त्यामुळे भाऊसाहेबांनी लावलेले विकासाचे झाड सुकू देऊ नका. बाळासाहेब थोरात ते शांत संयमी नेते आहे त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम हवे आहे. सध्याचे राजकारण हे बदल्याचे झाले आहे. यातून महाराष्ट्राचे नुकसान होत असून पुन्हा एकदा चांगले राजकारण करण्यासाठी सर्वांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.
तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की ,तालुक्यातील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यात तीर्थरूप भाऊसाहेब व डॉ अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांनी डॉ अण्णासाहेब शिंदे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे हिरे राज्यात शोधले आणि त्यातून ग्रामीण विकास साधला. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे माळरानावर कारखाना उभा राहिला .त्यांनी देशाला ,राज्याला मार्गदर्शन करताना संगमनेर तालुक्याला ही सातत्याने मार्गदर्शन केले. आज 9.5 लाख उत्पादन करणारा संगमनेर तालुका हा सहकाराचा तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. संगमनेरचा सहकार तीर्थरूप दादांनी वाढवला असून तो आपण सर्वांनी जपला पाहिजे. काही लोक मोडण्याचा प्रयत्न करतील. त्यांना वेळीच रोखले पाहिजे असेही ते म्हणाले
तर माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिस्त त्यात आणि नैतिकतेतून या परिसराचा विकास झाला आहे .भाऊसाहेब व अण्णासाहेब हे सर्वसामान्यांसाठी जगले. त्यांचा विचार हा बाळासाहेबांनी जोपासला आहे .उच्च कोटीची सकारात्मकता संयम असे व्यक्तिमत्त्व बाळासाहेब थोरात यांचे असून त्यांच्या कार्यकाळात विविध तालुक्यांमध्ये महसूलच्या व प्रशासकीय विभागाच्या अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. कारखान्यासह सर्व सहकाराचा चोख कारभार चालवताना त्यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला असून सध्या राज्यात जाती धर्माचे वाढलेले राजकारण चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
तर डॉ रावसाहेब कसबे म्हणाले की भाऊसाहेब व अण्णासाहेब यांनी डाव्या विचाराच्या तालुक्यांना निर्मितीक्षम बनविले. यावेळी मधुकरराव नवले, करण ससाणे, सचिन गुजर ,जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, संपतराव मस्के, उत्कर्षा ताई रूपवते , विजय बोराडे, अरुण पा कडू, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा बाबा खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे स्वागत ॲड माधवराव कानवडे यांनी केले. प्रास्ताविक मा. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सभापती शंकर पाटील खेमनर यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांना पुरस्कार
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, समाजसेवा व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना तर सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांना देण्यात आला. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आला. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बाळासाहेब थोरात हे उच्च कोटीची सकारात्मकता असलेले नेते
अत्यंत अभ्यासू ,शांत ,संयमी आणि सर्वांना बरोबर घेत विकास साधणारे बाळासाहेब थोरात ही अत्यंत उच्च कोटीचे सकारात्मकता असलेले नेते असून आगामी काळामध्ये पुन्हा एकदा समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यभरातील अनेक कार्यकर्ते पक्ष विरहित त्यांच्या पाठीशी उभे आहेत. असे सांगताना संगमनेर तालुक्यातील जनतेने राज्य पातळीला दिलेले आपले नेतृत्व जपण्यासाठी प्रामाणिक आणि कटिबद्ध राहावे असे माजी मंत्री विजय वडेट्टीवार व राजेश टोपे यांनी म्हटले आहे.