आपला जिल्हा

श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानकडून दिव्यांग दांपत्याला सायकल भेट

श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानकडून दिव्यांग दांपत्याला सायकल भेट

श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानकडून दिव्यांग दांपत्याला सायकल भेट

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ नोव्हेंबर २०२५माणुसकी अजून जिवंत आहे, हे दाखवून दिलं श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान, संवत्सर या सेवाभावी संस्थेने. समाजातील गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सदैव पुढे असलेली ही संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून संस्थेच्या वतीने गावातील एका दिव्यांग दांपत्याला सायकल भेट देण्यात आली.

जाहिरात

गावातील मंगल सूर्यभान देठे, या पायाने अपंग असलेल्या महिलेला आणि तिचे पती सूर्यभान देठे, जे दृष्टीहीन आहेत, या दोघांना रोजच्या हालचालींसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. या समस्येबद्दल संस्थेला माहिती मिळताच, श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने तत्काळ पुढाकार घेतला आणि मदतीचा हात पुढे करत सायकल भेट स्वरूपात दिली.सायकल सुपूर्द करताना संस्थेचे अध्यक्ष गोकुळ नामदेव पावडे आणि उपाध्यक्ष श पन्नालाल माधवराव नेहे यांनी स्वतः देठे दाम्पत्यांच्या घरी जाऊन ती दिली. सायकल मिळाल्यानंतर देठे कुटुंबाने संस्थेचे आभार मानले आहे.

जाहिरात

संस्थेच्या या उपक्रमामुळे समाजात पुन्हा एकदा मानवतेचा आणि सेवाभावाचा दीप प्रज्वलित झाला आहे. संस्था आवाहन करते  “आपल्यालाही अशा सेवाभावी कार्यात सहभागी व्हायचं असल्यास, श्री राम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान, संवत्सर यांच्याशी संपर्क साधावा.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे