कोल्हे गट

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कोल्हे गटाचे पंढरीनाथ पठाडे

कोपरगाव विजय कापसे दि २७ जानेवारी २०२५कोपरगाव गोधेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब हरिभाऊ पठाडे व व्हा.चेअरमन सरस्वती उत्तम रांधवणे यांनी परस्पर समन्वयातून ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा दिल्याने नवीन नियुक्तीसाठी प्रक्रिया पार पडली आहे.

जाहिरात

रिक्त झालेल्या पदावर दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी चेअरमन पदासाठी कोल्हे गटाचे पंढरीनाथ बाबुराव पठाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना सूचक म्हणून सरस्वती रांधवणे व अनुमोदक म्हणून भानुदास कोळसे यांनी सहकार्य केले.व्हा.चेअरमन पदासाठी काळे गटाच्या अरुणाबाई भाऊसाहेब भोकरे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक ठोंबळ साहेब व राहणे साहेब (सहकार खाते) व शिवाजीराव दवंगे तालुका सचिव कोपरगाव यांनी काम पाहिले. त्यांना सचिव अशोक घेर व सहसचिव दत्तात्रेय कारभार यांनी सहकार्य केले.

जाहिरात आत्मा

याप्रसंगी कोल्हे गटाचे जनार्दन शिंदे,माधवराव रांधवणे, सुभाष कानडे, रवींद्र रांधवणे,बाबुराव रांधवणे, भाऊसाहेब शिरसाट, परजणे गटाचे सयाराम कोळसे,सुदामराव कोळसे,वाल्मीकराव भोकरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व सोसायटी सभासद उपस्थित होते.

जाहिरात

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,  माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे