संगमनेर

गाईंचे भ्रूण प्रत्यारोपण ही व्यावसायिक गरज – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

गाईंचे भ्रूण प्रत्यारोपण ही व्यावसायिक गरज – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

भ्रूण प्रत्यारोपणामुळे दुधाळ गायींची संख्या वाढेल

संगमनेर विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२५ऊस आणि दूध हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे आहे. संगमनेर तालुक्यामध्ये दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून आगामी काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन निर्माण करणे आणि त्यातून किफायतशीर दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे याकरता गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

संगमनेर तालुका सहकारी दूध संघ व गोदरेज कॅटल जेनेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक आर.बी.राहणे, गोदरेज कॅटलचे व्ही सुभाष, डॉ.रामदास ननावरे, डॉ. दिनेश भोसले, डॉ.प्रमोद पावसे, गणपतराव सांगळे,दत्तात्रय थोरात,कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, डॉ. जाखर, डॉ. श्रेया शास्त्री, डॉ. सोमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

जाहिरात आत्मा

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, राजहंस दूध संघाने गुणवत्तेमुळे आपला देशात लौकिक निर्माण केला आहे. संगमनेर तालुका हा दूध उत्पादनामध्ये आघाडीवर असून दुग्ध व्यवसायातून छोट्या शेतकऱ्यांना मोठी मदत मिळत असते. दूध संघाने सातत्याने विविध योजना राबवल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. आगामी काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन निर्माण करणे गरजेचे आहे. या व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शाश्वोक्त पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला तर नक्कीच फायदा जास्त मिळणार आहे. भ्रूण प्रत्यारोपण हे आर्थिक दृष्ट्या खर्चिक बाब असली तरी त्यातून दुधाळ गाईंची निर्मिती होईल आणि त्या माध्यमातून दूधउत्पादकांचा आर्थिक स्तर सुधारेल. त्यासाठी स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांनी गायींमधील भ्रूण प्रत्यारोपण याबाबत दूध उत्पादकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, दूध संघाने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन 50  अंतर्गत 50 लिटरच्या गाईंची निर्मिती करणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार गोठा, आहार, आरोग्य व्यवस्थापन व प्रजनन या बाबींवर शास्त्रीय पद्धतीने काम केले जात आहे त्यातूनच आधुनिक दूध देणाऱ्या गाईंची निर्मिती केली जाणार आहे.

जाहिरात

याप्रसंगी गोदरेज कॅटल जेनेटिकचे ही सुभाष, डॉ.रामदास ननावरे, डॉ.दिनेश भोसले यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी केले. तर डॉ.प्रमोद पावसे यांनी आभार मानले. यावेळी विविध स्वयंरोजगार केंद्राधिकारी व विविध दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे