संगमनेर

अमृतवाहिनीत बॉलीवूडचा गायक अमाल मलिकच्या गीतांची धमाल; मेधा महोत्सवात लाईव्ह कॉन्सर्ट संपन्न

अमृतवाहिनीत बॉलीवूडचा गायक अमाल मलिकच्या गीतांची धमाल; मेधा महोत्सवात लाईव्ह कॉन्सर्ट संपन्न

हजारो विद्यार्थ्यांनी धरला ठेका

जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२५अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात बॉलीवूडचा आघाडीचा गायक व संगीतकार अमाल मलिक यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये झालेल्या विविध गीतांच्या धमाकेदार सादरीकरणावर उपस्थित सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी ठेका धरला. तरुणाईच्या जल्लोषात झालेल्या या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

मेधा मैदानावर झालेल्या या लाईव्ह कॉन्सर्ट प्रसंगी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे, कांचनताई थोरात, कार्यकारी विश्वस्त  शरयूताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन भाऊ थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेघाचे समन्वयक प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, प्रा.व्ही.बी.धुमाळ, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते,डॉ.बाबासाहेब लोंढे,विलास भाटे, डॉ.राजेंद्र वाघ, शितल गायकवाड, जे. बी. सेठी, अंजली कन्नावार, डॉ.विलास शिंदे,प्रा.जी.बी.काळे, प्रा.विजय वाघे, प्रा.जी.बी.बाचकर, नामदेव गायकवाड आदींसह सर्व विभाग प्रमुख शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

मेट्रो शहराप्रमाणे आयोजन, सुसज्ज बैठक व्यवस्था, आकर्षक लाइटिंग, साऊंड सिस्टिम, एलईडी आणि विद्युत रोषणाई उजळून निघालेल्या मेघा मैदानावर बॉलीवूडचा आघाडीचा गायक अमाल मलिक यांचे भव्य स्टेजवर आगमन झाले. यावेळी तरुणाईचा एकच जल्लोष झाला. संगमनेरकरांना अभिवादन करत अमाल मलिक याने तू आता है सीने मे, जब जब सासे भरती हू, तेरे दिल की गलियो से मै हर रोज गुजरती हू या गीताने सुरुवात करताना विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला.

जाहिरात

या नंतर हुआ आज पहिली बार, जो ऐसे मुस्कुराया हु या गीताला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. तर खोल दो ना जरा दिल मे, या गीताला विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतले. यानंतर जुन्या गाण्यांमधील हंम्मा, हंम्मा या गीताने तर धमाल केली. याचबरोबर शोले मधील महबूबा महबूबा या सर्वांना ठेका धरायला लावला. दम मारो दम, घर से निकलते ही, मुकाबला, हे गीत अमाल मलिक याने थेट विद्यार्थ्यांमध्ये येऊन गायीली विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून तोही भारावून गेला. त्याच्या समवेत गायिका रिचा नारायण व यश नार्वेकर यांनीही विविध गीते सादर करून एकच धमाल केली.

प्रत्यक्ष पियानोवर बसून त्याने चलते चलते मेरे ये गीत याद रखना हे गीत गायल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दोन तास झालेल्या हिंदी,पंजाबी, मराठी गीतांच्या या धमाल सादरीकरणाने हा लाईव्ह कॉन्सर्ट विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नाचून धमाल केली. या सर्व गीतांना विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ठेका धरत उत्स्फूर्त दाद दिली.

या लाईव्ह कॉन्सर्टसाठी पालकांसह अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलीटेक्निक, एमबीए, बी फार्मसी, डी फार्मसी,आयटीआय, मॉडेल स्कूल, जुनियर कॉलेज, एग्रीकल्चर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल,अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल या सर्व विभागांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थी उपस्थित होते.

अमृतवाहिनीत तारांगण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.शरयुताई देशमुख, राजवर्धन थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात व अमाल मलिक यांचे व्यासपीठावर आगमन झाल्याच्या नंतर अमृतवाहिनी मधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल टॉर्च ऑन करून व्यासपीठावरील सर्वांना मानवंदना दिली. यावेळी अमृतवाहिनीचा पूर्ण परिसरात हा मोबाईल टॉर्च झगमगटांनी उजळून निघाला. तर अमृतवाहिनीत तारांगण निर्माण झाले होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे