कोपरगाव तालुका केमिस्ट भवनाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन
समस्त केमिस्ट बांधवांचे स्वप्न झाले साकार
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२५– संबंध भारतभरातील केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले केमिस्ट हृदयसम्राट माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथे नव्याने तयार झालेल्या ‘कोपरगाव तालुका केमिस्ट भवन’ या वास्तूचे मोठ्या जल्लोषात रविवार दि २ फेब्रुवारी रोजी राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे,अखिल भारतीय औषधं विक्रेता संघटना चे निमंत्रित सदस्य अजित पारख, सेंट्रल झोन चे अध्यक्ष नरेश भगत,सेंट्रल झोनचे सचिव महेश भावसार, संघटक सचिव चेतन कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष जवाहरलाल शहा, जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेंद्रे, उपाध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, खजिनदार प्रशांत उबाळे, सहसचिव सचिन शिंदे, कार्यकारणी सदस्य माऊली दरंदले, तात्याराव बांदल, बाळासाहेब डरांगे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष कृष्णा आढाव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
जाहिरात
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचे स्वागत जेसीबीतून भव्य पुष्पृष्टीने होऊन मान्यवरांच्या शुभहस्ते केमिस्ट भावनाचे उद्घाटन फीत कापून माता धन्वंतरी ची पूजा व दीप प्रज्वलाने मुख्य कार्यक्रमास सुरुवात होऊन समस्त भारतभरातील वैद्यकीय क्षेत्रात कार्य केलेल्या दिवंगत बांधवांना श्रद्धांजली अर्पण करत फार्मसी होत घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोपरगाव तालुका अध्यक्ष गणेश वाणी यांनी करताना ज्येष्ठ केमिस्ट सदस्य विजय जगताप, विलास आवारे, श्याम डागा, मदन बागरेच्या, विजय जोशी, राजकुमार गुजराठी आदी ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शनाने हे भवन उभे राहिले असून समस्त केमिस्ट बांधवांना शहरात उठ-बस करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले असल्याचे सांगत मार्गदर्शन सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले.
जाहिरात
सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत तालुका उपाध्यक्ष भरत मोरे यांनी केले तसेच संघटनेचा वार्षिक लेखाजोखा कार्य अहवालाचे वाचन सचिव प्रवीण गवळी यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम डरांगे व आभार सचिन अमृतकर यांनी व्यक्त केले.
जाहिरात
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष गणेश वाणी, भरत मोरे, सचिन अमृतकर,विजय जगताप,प्रवीण गवळी, रूपाली मते, नितीन खैरनार,ऋतूल जाधव, प्रशांत बोरावके, संदीप डागा, संदीप गोळेच्या आदींनी अथक परिश्रम घेतले तर मंदार पहाडे, अजय शहा, श्रीकांत पैठणे, अपर्णा गाडेकर तज्ञ मार्गदर्शक अरुण गव्हाणे, ओम प्रकाश डागा, आप्पासाहेब नवले, संजय वाकचौरे, जितेंद्र गंगवाल, प्रमोद शिंदे, नितीन दवंगे, अविनाश जाधव आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी तालुका केमिस्ट असोसिएशनच्या महिला सभासदांच्या संकल्पनेतून जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची औषध व गुळ तुला करत ते सर्व औषधे ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली तर ७५ दिव्यांद्वारे औक्षण करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी नव्याने उभ्या राहिलेल्या भव्य अशा केमिस्ट भवनांचे कौतुक करत तालुका अध्यक्ष गणेश वाणी व सर्व पदाधिकारी सदस्यांच्या मेहनतीस दाद देत भविष्यात समाजपयोगी कार्य करण्यासाठी शुभेच्छा देत मी तुमचा सोबत असल्याचा शब्द दिला, तर या प्रसंगी जेष्ठ सदस्य जवाहरलाल शहा, दत्ता गाडळकर, अतुल आहिरे, अजित पारख आदींनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले