आईचा वाढदिवस जिममध्ये साजरा; सर्वांनी घेतला तिचा आशीर्वाद आणि दिल्या शुभेच्छा
आईचा वाढदिवस जिममध्ये साजरा; सर्वांनी घेतला तिचा आशीर्वाद आणि दिल्या शुभेच्छा
आईचा वाढदिवस जिममध्ये साजरा; सर्वांनी घेतला तिचा आशीर्वाद आणि दिल्या शुभेच्छा
कोपरगाव विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२५– वाढदिवस म्हटला की आनंद, सेलिब्रेशन आणि खास क्षण! मात्र, कोपरगाव शहरात अगदी अनोख्या पद्धतीने मुलाने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. पारंपरिक घरी किंवा हॉटेलमध्ये साजरा करण्याऐवजी, दीपक साहेबराव पगारे यांनी त्यांच्या मातोश्रीचा ६४ वा वाढदिवस हा थेट जिममध्ये साजरा केला असून सोशल मीडियावरती त्यांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
सकाळी व्यायामासाठी आलेल्या सदस्यांनी आणि कुटुंबीयांनी आईचां वाढदिवस मोठया उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला.
सर्वांनी आईचां आशीर्वाद घेत शुभेच्छा दिल्या आणि तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या खास प्रसंगी आईला भेट म्हणून बाबा जिमच्या सदस्यांकडून सुंदर अशी साडी भेट म्हणुन देण्यात आली.
आरोग्य जपणाऱ्या आणि फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या आईसाठी हा वाढदिवस हा विशेष ठरला. वाढदिवस आणि आरोग्य यांचा उत्तम संगम साधत, कुटुंब आणि जिममधील सदस्यांनी हा दिवस संस्मरणीय बनवला!
या आनंदाच्या प्रसंगी बाबा जिमचे संचालक अमीन भाई सय्यद, डॉक्टर दीपक पगारे, डॉक्टर पठाण ,याकुब शेख, दत्तूभाऊ पगारे, प्रतीक पाटील, सुरेश गोरे सर, गुंड भाऊसाहेब, घुगे भाऊसाहेब ,अनिकेत दिवे ,रेवन यादव,गौरव इंगळे,हर्षल डाके, योगेश काळे शुभम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.



