अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात २४ व २५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात २४ व २५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
संगमनेर विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२५– अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद इनोव्हेटिव्ह फार्मसी अमृतवाहिनी २०२५ “ड्रग डिस्कव्हरी अँड डेव्हलपमेंट फ्रॉम कॉन्सेप्ट टू कमर्शियलायझेशन” या विषयावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.पी.शिरभाते यांनी दिली आहे.जाहिरात आत्मा
औषधनिर्माणशास्त्रातील विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांच्या नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचा व तंत्रज्ञान आणि ट्रान्सडिसिप्लिनरी शिक्षणाच्या चौकटीत असलेल्या अमर्याद शक्यतांचा शोध घेण्याचा प्रयत्न तसेच वेगवान तांत्रिक प्रगती आणि गुंतागुंतीच्या जागतिक आव्हानांनी परिभाषित केलेल्या युगात ही परिषद औषधनिर्मिती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे.जाहिरात
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतासह अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया,थायलंड आदी देशांमधून १० पेक्षा अधिक मार्गदर्शक मार्गदर्शनासाठी येणार असून या परिषदेत देशविदेशातील औषधशास्त्रज्ञ, शोधकर्ते, शिक्षक, औषध विद्यार्थी आणि औषध संबंधित संस्थांचा समावेश असणार आहेत. या परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून इंडियन फार्माकोपिया कमिशन,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मधील वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ. व्ही.कलाईसेल्वन हे उपस्थित असणार आहेत.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक ‘एफ’ आणि प्रमुख नॅशनल सेंटर फॉर प्रीक्लिनिकल रिप्रॉडक्टिव्ह अँड जेनेटिक टॉक्सिकोलॉजी आयसीएम आर- नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ, महाराष्ट्र, भारत चे डॉ. विकास दिघे असणार आहेत. तसेच अमेरिका येथून डॉ.मनोज जाधव,डॉ. आभा चाळपे-घोष,तर इंडोनेशिया येथील मास्टरिया युनोविल्सा, द्वि .मारलीना शोऊकरी, थायलंड येथील ईक्कासित कुमारनसित, मलेशिया येथील डॉ.झुरिना बिनती हसन,भारतातील डॉ.नितीन माळी, श्री.सचिन जोशी,इशिता श्रीवास्तव आदी मान्यवर मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.या परिषदेसाठी येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांसाठी भारतीय कला व संस्कृती दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
जाहिरात
औषधनिर्माणशास्त्रातील नामांकित तज्ज्ञ मार्गर्शकांचे मार्गदर्शन, पॅनेल चर्चा, तांत्रिक सत्रे आणि संशोधन सादरीकरणाच्या माध्यमातून ही परिषद ज्ञानाची देवाणघेवाण, सहकार्यात्मक उपक्रम, धोरणात्मक शिफारशी आणि बदलासाठी एक प्रेरणादायक माध्यम ठरणार आहे. सदर दोन दिवशीय परिषद हि प्राध्यापक ,पी एच डी स्कॉलर्स ,इंडस्ट्री मधील व्यक्ती,विद्यार्थी ,संशोधनामध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञ यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार असून एक मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
जाहिरात
संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त मा. आ.डॉ. सुधिर तांबे,कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्थ सौ.शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी.शिंदे, संस्थेचे अकॅडेमिक डायरेक्टर डॉ.जे.बी गुरव यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या संधीचा फायदा घेत या परिषदेमध्ये जास्तीत जास्त फार्मसी स्कॉलर्स यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम पी.शिरभाते यांनी केले आहे.