संगमनेर

भाऊसाहेब थोरात यांचे राजकीय चिंतन -डॉ.रावसाहेब कसबे

भाऊसाहेब थोरात यांचे राजकीय चिंतन डॉ.रावसाहेब कसबे

भाऊसाहेब थोरात यांचे राजकीय चिंतन डॉ.रावसाहेब कसबे

जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि १४ मार्च २०२५कोणताही माणूस त्याच्या सत्तर-ऐंशी वर्षाच्या आयुष्यात आपल्या जीवनाच्या कालपटावर स्वत:ची अशी खास पावले उमटवित असतो.मग तो सामान्य असो की असामान्य त्याच्या पाऊलखुणा त्याच्या निकटवर्तीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात.काहींच्या पाऊलखुणांची पायवाट होते.आणि त्यावरुन अनेक जणांचा जीवनप्रवास सुखकारक बनतो.तर काहींच्या पाऊल खुणा महामार्ग बनतात आणि त्यावरुन असंख्य माणसे प्रवास करतात त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी असतो या प्रेरणा व्यक्तीगत नसतात,तर त्या समष्टीला कवेत घेऊन बहुजन हिताय,बहुजन सुखाय बनलेलेल्या असतात त्यांच्यात व्यक्तीविकासाबरोबरच समुहाच्या विकासाचा विचार अंतर्भूत असतो.त्यांच्या प्रकाशात व्यक्तीजिवन आणि समूहजीवनाला योग्य आकार देण्याचे सामर्थ्य असते.त्यांच्यात जीवन समृध्द करणारी स्वप्ने असतात आणि जगण्याच्या संघर्षात ती स्वने वास्तवात आणण्याची जिद्द असते.सर्वांगिण विकासाची अशी स्वप्ने देणारे आणि ती वास्तवात आणण्यासाठी स्वत:चे जीवण पणाला लावणारे पुरुष म्हणुनच संख्येने फार थोडे असतात. ते इतिहासाचे निर्माते असतात.इतिहास हे एकट्या दुकट्याचे काम नसते,हे तर खरेच परंतु यांच्या साह्याने नवा इतिहास घडवायचा असतो त्यांचे मन जाणुन घेण्याचे आणि त्यांना त्या दिशेने गतीमान करण्याची क्षमता मात्र इतिहास घडविणार्‍यात असावी लागते.त्याला त्याच्या युगाची इच्छा समजुन घ्यावी लागते.त्यातुनच बहुमान्य नेतृत्वाचा उदय होतो.हे नेतृत्व स्वत:ला घडवित विकसित होत जाणारे असते,तसेच ते समूह मनात चेतना निर्माण करुण त्यालाही आकार देत असते. भाऊसाहेब थोरात हे अशाच नेत्यांपैकी एक नेते होते.

जाहिरात

                त्यांच्या या आत्मचिंतनपर लेखनातुन त्यांच्या जिवनाचे प्रमुख तीनकालाखंड पडतांना स्पष्ट दिसतात, पहिला कालखंड विद्यार्थी दशेतला, राष्ट्रप्रेमाने ओथंबलेला, ब्रिटीश सामा्रयशाही विरोधी एल्गार पुकारलेलाम,मार्क्सवादी विचारांनी झपाटलेल्या आणि आपल्या स्वत:च्या क्षमतेप्रमाणे सर्व शक्तीनिशी कृतीशिल बनलेला, दुसरा कालखंड हा आपल्या ध्येय निष्ठेला वास्तवात उतविण्यासाठी विविध मार्ग शोधणारा. या मार्गात सशस्त्र क्रांतीपासून ते सहकारपर्यंतचे अनेक मार्ग धुंडाळणारा आणि शेवटी सहकारी चळवळीचा मार्ग स्विकारणारा, तिसरा कालखंड त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ होय.यात त्यांनी एकाद्या तरुणालाही लाजविल अशा तडफेने दंडाकारण्याची चळवळ हाती घेतलेली. तीनही कालखंडात त्यांनी समरसून केलेले काम,त्यांच्या विद्यार्थीदशेपासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांची अखंड चाललेली तपश्‍चर्या आणि कृतीशिलता म्हणजेच भाऊसाहेब थोरात यांचे जीवन होय.

जाहिरात

                भारतीय राजकीय इतिहासात 1940चे दशक हे अभूतपुर्व होते.महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देश ब्रिटीश सामा्रय शाही विरुध्द पेटुन उठला होता.राष्ट्रप्रेम व्यक्त करणे ही विशिष्ट जातीवर्गाची मक्तेदारी राहीली नव्हती.राष्ट्रकार्यासाठी परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन येणे किंवा पिस्तुल खरेदी करुन चारदोन ब्रिटीश अधिकार्‍यांचे खून करुन जीवावर उदार होणे याची आवश्यकता राहीली नव्हती.गांधीचींचे भारतीय राजकीय चळवळीला सगळ्याात मोठे योगदान कोणते असेल ते हे की ,त्यांनी देशातील सामान्यतल्या सामान्य स्त्रीपुरुषासाठी राष्ट्रसेवेची सर्व दारे सताड उघडी केली.त्यामुळेच भांडवलदारांपासून ते चर्मकार समायातील सामान्य स्त्री पर्यंत सर्वजण स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊ शकले.स्वातंत्र्य चळवळ समायातील सर्व स्तरांना कवेत घेऊन विस्तारत गेली,कारण प्रत्येक जण त्याच्या कुवती प्रमाणे जे शक्य होई्रल ते करण्यास सज झालेला होता.डोक्यावर गांधी टोपी आणि ओठावर ’’जयहिंद’’चा नारा ही स्वतंत्र्य चळवळीची प्रतिके बनली होती.या चळवळीत विद्यार्थी काय करु शकत होते.त्या काळात संदेशवाहक तारा हे ब्रिटीशांचे सर्वांत वेगवान अशे माहिती देणारे हत्यार होते.त्यामुळे ब्रिटीश साम्रायशाही काही तासात जनआंदोलन मोडून काढु शकत होती.त्या तारा आणि त्यांचे खांब तोडून टाकले तर ब्रिटीश हातबल होतील आणि स्वातंत्र्य चळवळीचा वनवा देशभर पेटेल आणि परिस्थीती त्यांच्या नियत्रंनाबहेर जाईल हा विचार त्यामागे होता हे काम आपणही करु शकतो आणि त्यातुन राष्ट्रप्रेम व्यक्त होऊ शकते. याची जाणिव संगमनेर,अकोले तालुक्यातील या तरुणांना झाली. त्यात आण्णासाहेब आणि रावसाहेब शिंदे हे बंधु धर्माजी पोखरकर,पी.जी.भांगरे,भास्करराव दुर्वे इ.तरुण जसे होते.त्यात भाऊसाहेब थोरातही होते.हे काम त्यांनी कसे केले.ते करत असतांना कोणते आव्हाने त्यांना पेलावे लागले आणि त्यांची शिक्षा तुरुंगवासाच्या रुपाने त्यांनी कशी भोगली या सर्वांचा तपशिल साहेबांच्या अमृतमथंन मध्ये आहे. कोवळ्याा वयात नाशिक जेलमध्ये असतांना त्यांच्यावर कोणत्या विचारांचे संस्कार होत होते.याचा तपशिलही आपल्याला त्याच ग्रथांतुन मिळतो.स्वप्त:भाऊसाहेबांनीच लिहुन ठेवले आहे.की तुरुगांत त्याच्यावर तीन ग्रथांचा सर्वांधीक प्रभाव पडला. त्यात मार्क्स,एंगलस याचा ’’कम्युनिष्ट  जाहिर नामा ’’ एडगर स्नो यांचा ’’रेड स्टार ओव्हर चायना ’’आणि रजनी पामदत्त यांचा सोशॉलिझम आणि फॅसिझम या विषयावरिल ग्रंथ यांचा समावेश होता.भाऊसाहेबांसाठी त्यावेळचा नाशिकचा तुरुंग हा तुरुंग राहीला नव्हता,-ाान संपादन करण्याची ते एक अभिनव ठिकाण झाले होते.चर्चा आभ्यास मंडळे यातुन जगातील सर्व घडामोडींचे ज्ञान मिळत असे.या तुरुंगाच्या रुपाने जणू काही आम्हाला ज्ञानाचे अखंड भांडारच सापडले होते. भारतीय राजकारणात स्वतंत्र्यसैनिकांचे राजकीय विचार ब्रिटीशांच्या तुरुगांनेच पक्के केले.त्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनासाठी मोठमोठे नेते. त्यांच्या सोबत होते.पुस्तकांचा साठा वाढत होता.आणि साधक बाधक चर्चेसाठी समवयस्क जि-ाासू मित्रही होते.

जाहिरात

                आपण अनेकदा मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पक्ष जणू काही एकच आहोत.असे मानत असतो मार्क्सवाद ही या संपुर्ण जगाकडे आपण या समाजात राहतो त्याकडे आणि स्वत:कडे बघण्याची एक जीवन दृष्टी आहे. मार्क्सवाद हे वास्तवाचे आणि इतिहासाचे सुध्दा सम्यक आकलन करण्याचे एक शस्त्र आहे. कम्युनिस्ट पक्ष हा व्यवस्थित क्रांतीकारी परीवर्तन घडुन आणनारी राजकीय संघटना आहे.शेतकरी कामगांचे शोषणमुक्त राय स्थापण करणे हे तिचे उदिष्ट आहे.हे करीत असतांना तिला विविध डावपेच आखावे लागतात.सत्ताप्रप्तीसाठी प्रयत्न करावे लागतात आणि सत्ताप्राप्तीनंतर समाजवादी समाजव्यवस्था प्रस्थापीक करावी लागते.परंतु हे सारे घडविणारी शेवटी माणसेच असतात त्यांचे अनेक अंदाज चुकू शकतात तत्व आणि व्यवहार यांचा सांधा जुळत नसतो.आणि राजकीय पक्ष भरकटू शकतो त्यामुळे अनेकांना या राजकीय पक्षाच्या अनेक भूमिका मान्य होत नसतात.राजकीय पक्षातील कठोर शिस्तही अनेकांना मानवणारी नसते.म्हणुन अनेक लोक मार्क्सवादी असुनही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसतात.हे आजचे जगभराचे वास्तव आहे.या शेतकरी कष्टकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र परीवर्तन करण्यासाठी कम्युनिष्ट पक्ष निर्माण झालेला असतो त्यांकडून जर त्यांच्या जीवनात कोणतेच परीवर्तन घडत नसेल तर त्या पक्षात राहण्यापेक्षा तो सोडण्याचाच आणि आपल्या ध्येय प्राप्तीसाठी अन्य मार्ग धुंडाळण्याचा अनेक कार्यकर्ते प्रयत्न करतात.भाऊसाहेब थोरातही याच पेचात अडकले होते. कम्युनिष्ट  पक्षात त्यांनी नेटाने काम केले टिटवाळ्याापासुन ते वरुडीपठार पर्यंत अनेक गावांत किसान सभे मार्फंत शेतकरी परीषदा घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला.कधी भूमिगत राहून तर कधी उघडपणे समाजप्रबोधन केले परंतु त्यांना अपेक्षित असलेला सामाजिक बदल दिसत नव्हता. स्वतंत्र्यानंतरही कम्युनिष्ट  पक्षाच्या ध्येय धोरणात त्यांना सतत धरसोड जाणू लागली, शेतकरी वर्गासाठी कम्युनिष्ट पक्ष कोणतेही ठोस धोरण घेतांना त्यांना दिसत नव्हता. अशा वेळी अन्य मार्ग शोधणे त्यांना आवश्यक वाटले हा मार्ग त्यांना सहकारी चळवळीत दिसला. ते जोर्वे सहकारी संघाचे अध्यक्ष झाले आणि तेथून पुढे त्यांच्या आयुष्याचे दुसरे पर्व सुरु झाले.

                जोर्वे सहकारी संघापासुन ते महाराष्ट्र सहकारी बँकेसारख्या शिखर संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्या पयर्र्तचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा कालखंड होता. शेतक-यांना कमी व्याजदरात कर्ज देणे, शेतीत सिंचनाची व्यवस्था करणारी यंत्रणा उभी करणे, सहकारी साखर कारखाना ऊभारुन तो आदर्श पध्दतीने चालविणे, शेतक-यांना इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला भाव देणे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणाची व्यवस्था करणारे शैक्षणिक संस्थाचे जाळे उभारणे, ही कामे एका अर्थाने नवनिर्मिती करणारी कामे होती.भाऊसाहेबांना त्यातच अधिक रस होता कारण या कामात ते आपली सारी कल्पकता आणि क्षमता पणाला लाऊ शकत होते.दोन – अडीच   वर्षे ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून गेले होते परंतु त्यात ते फारसे रमलेले दिसत नाहीत. त्यांच्या दृष्टीने सहकाराचे क्षेत्र हेच शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे साधन वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपले आयुष्य त्याच क्षेत्राला समर्पित केले. संगमनेर तालुक्याचा जो विकास आज आपण पाहतो,तो या समर्पणचेच फळ आहे असे मानले पाहिजे.

                वास्तविक पाहता सहकारी चळवळीचा जन्म एकोणिसाव्या शतकात पाश्‍चात्य देशात झाला. तिच्या अनेक जन्मदात्यांपैकी रॉबट ओवेन हे एक प्रमुख जन्मदाते होते.मुळात सहकार हे एक जीवन व्यापी तत्व-ाान होते त्याचा उदयच भांडवलशाही समर्थ पर्याय देणे हा होता.परंतु कालौघात भांडवलशाही आपली रुपे सतत बदलत आली आणि सहकाराला तिने आपल्या पोटात सामावून घेतले त्यामुळे आज सहकार हे भांडवलशाहीला पर्याय म्हणून नव्हे तर पूरक ठरेल असे त्याचे रुप बनले आहे. हे सर्व खरे असले तरी सहकार चळवळीला भाऊसाहेबांसारखे निष्ठावंत नेतृत्व लाभले तर ते सहकारावर भांडवलशाहीने घातलेल्या मर्यादा ओलांडून कसे कृतिशील बनू शकते हे संगमनेर तालुक्याने पाहिले आहे. आज या तालुक्यातील छोटयातल्या छोटया खेडे गावापासून ते तालुक्यापर्यत विणले गेलेले सहकाराचे जाळे हे संगमनेर तालुक्याचे भूषण आहे. आणि त्याचे शिल्पकार भाऊसाहेब थोरात आहेत.

                वयोमानाप्रमाणे पुढे शरीरही थकत जाते तो निसर्गाचा नियमच आहे. या काळात शरीर व मन यांचा प्रचंड संघर्ष सुरु होतो अशा वेळी स्थितप्र-ा वृत्तीने निवृत्ती स्विकारणे हाच एकमेव पर्याय असतो भाऊसाहेबांनी या या क्षेत्राची उभारणी केली ते प्रत्येक क्षेत्र योग्य व्यक्तीच्या हाती सोपवून भाऊसाहेब काहीसे निवृत्त झाल्यासारखे वरवर दिसत होते. परंतु आतील ध्येयनिष्टा आणि कृतिशीलता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यांच्या आयुष्यातील शेवटची सात  आठ वर्षे म्हणूनच त्यांनी पर्यावरणासारख्या महत्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष केंदीत केले. तिथेही ते त्यांच्याजवळ असलेल्या सर्वशक्तीनिशी कृतीशील बनले. आपल्या वाचन चिंतनातून त्यांना पर्यावरणाचा -हास बघवत नव्हता उजाड झालेले डोंगर आणि माळराने त्यांना अस्वस्थ करीत होती त्यातुनच त्यांना दंडकारण्याची कल्पना सुचली. तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्याना त्यांनी कामाला लावले.पावसाळयापूर्वी त्या बिया डोंगर आणि माळरानांवर पेरण्याची तयारी केली त्यांचे हे दंडकारण्याचे अभियान हे त्यांच्या आयुष्याचे तिसरे आणि शेवटचे पर्व होते.माणूस हा निसर्गातून उन्नत झाला असला. तरी तो निसर्गाचा अविभाय भाग आहे याची त्यांना जाणीव झाली. याचे कारणही बहुधा त्यांच्या अंतर्यामी कार्ल मार्क्स आणि त्यांचे विचार भक्कमपणे रुजवले असावेत हेच असावे. कार्ल मार्क्स यांनी निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यावर अभूतपुर्व असे चिंतन केलेले होते.दुदैवाने मार्क्स यांचे हे विचार त्यांच्या वारसदार म्हणवून घेणार्‍यारांनी दुर्लक्षित केले.भाऊसाहेबांनी मात्र आपल्या आयुष्याच्या शेवटी त्याच विचारांना वाहून घेतलेले दिसते. कार्ल मार्क्स यांनी लिहीले होते की,”Nature is organic body of the man ’ निसर्ग हा माणसाचे निरिन्द्रय शरीर आहे.माणसाला जर जिवंत राहवयाचे असेल तर निसर्गाला जपले पाहिजे. त्याचा विध्वंस करुन माणूस जिवंत कसा राहू शकतो.माणसांला माणूस म्हणुन जिवंत राहावयाचे असेल तर निसर्गाशी त्यांचे अतूट आणि संतुलित  असे नाते असले पाहिजे. दंडाकरण्याची चळवळ म्हणजे हेच अतुट आणि संतुलीत नाते निर्माण करण्याचा एक सू-ा आणि दूरदृष्टीचा प्रयत्न होता.त्यात सामान्य माणसाबद्दलचे एक विलोभनिय बांधिलकी होती.भाऊसाहेबांना त्यांच्या आयुष्यात अन्यायाविरुध्द विद्रोह,समाज बांधणीसाठी सहकार आणि माणसाचे माणूसपण जपण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन हा वारसा देवून ठेवलेला आहे.तो नेटाने पुढे चालविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.– डॉ.रावसाहेब कसबे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे