आपला जिल्हा

महावितरण कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा; गुन्हा दाखल

महावितरण कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा; गुन्हा दाखल

संवत्सर गावातील घटना
जाहिरात कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि १५ मार्च २०२५कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातील महावितरण चे कर्मचारी शासकीय कामासाठी गेले असता गणपत रामदास गायकवाड यांनी त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात आत्मा

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश विक्रम सुरवसे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कोपरगाव येथे विद्युत सहाय्यक या पदावर कार्यरत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शनिवारी १५ मार्च रोजी सकाळी ९.१५ वाजता कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मी नगरचे रहिवासी गणपत विठ्ठल गायकवाड यांच्या घरी सहकारी मयूर प्रभाकर गोरे यांच्यासह सरकारी कामानिमित्त गेले असता गणपत गायकवाड यांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यास  सरकारी कामात अडथळा करून बळजबरीने धक्काबुक्की शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गणपत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०२४ बीएनएस कलम १३२,११५ (२) ३५२,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर हे करत आहे.

जाहिरात

सदर आरोपी हा फिर्यादी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांना अतिशय अर्वाच्य भाषेत दमदाटी शिवीगाळ धक्काबुक्की करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे