आपला जिल्हा

लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर

लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर

लाचलुचपत प्रकरणात महसुल तलाठी धनंजय प-हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजुर

जाहिरात कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि १५ मार्च २०२५कोपरगाव येथील महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेले धनंजय गुलाब प-हाड यांनी वाळुचे प्रकरणांवर कारवाई करु नये, म्हणुन लाचेची मागणी केली व आपल्या एका सहकाऱ्यांमार्फत ती रक्कम स्विकारली, अशा आशयाची तक्रार लाचलुचपत विभागाकडून दाखल झालेली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला व त्या सापळ्यामध्ये मुळ तक्रारदारांकडून रक्कम रुपये २० हजार स्विकारली व ती रक्कम तलाठी यांचे सांगण्यावरुन आरोपी सागर चौधरी यांनी स्विकारली होती, अशा आशयाच्या तक्रारी वरुन आरोपी सागर उर्फ बबलु चौधरी यांना अटक करण्यात आली होती व त्या अनुशंगाने आरोपी सागर उर्फ बबलु चौधरी व धनंजय गुलाब पन्हाड यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियम कायदा कलम ७.७अ. १२ प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

जाहिरात आत्मा

आरोपी महसुलचे कर्मचारी तलाठी धनंजय गुलाब प-हाड यांनी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन दाखल केला होता व मुळ तक्रारदार वाळ व्यवसायीक असल्याची तक्रार करुन त्याचे विरुद्ध तलाठी पन्हाड यांनी वाळूचे संदर्भात दंडात्मक कारवाई केल्याचे व अन्य आरोपी सागर चौधरी व मुळ तक्रारदार यांचीच एक मिलाफी असल्याचे कथन करुन शासकिय आधिकाऱ्यांवर दडपण आणण्याचा मुळ तक्रारदार प्रयत्न करत आहे व भष्टाचार कायद्याचा दुरूपयोग केल्याचे मे. न्यायालयाचे निदर्शनास आणुन व ज्यावेळेस लोकसेवक व तक्रारदार यांचे बोलणे झाल्याची वेळ फिर्यादमध्ये दर्शवली, त्यावेळेस लोक सेवक तलाठी हे त्यांचे सहकाऱ्यांबरोबर व वरिष्ठ महसुल व पोलीस अधिकारी यांचेबरोबर गौन खनिज उत्खनन पंचनामा करत असल्याचे निष्पन्न झाले होते व त्यामुळे आरोपीच्या कस्टडीची गरज नसल्याचे कथने करुन, अशी मे. न्यायालयात याचिका दिली व त्यात वेगवगेळ्या उच्च न्यायालयांचे निकाल दिले.

जाहिरात

याप्रकरणात सरकारी पक्ष व मुळ तक्रारदार यांचेवतीने विरोध करण्यात आला व उभय पक्षकारांचे युक्तीवादानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांनी लोकसेवक धनंजय गुलाब प-हाड यांचा योग्य त्या अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला.

जाहिरात

सदरील प्रकरणाकडे संपुर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले होते. लोकसेवक पन्हाड यांचेवतीने अॅड. जयंत आत्माराम जोशी यांनी प्रकरणाचे कामकाज पाहिले व त्यांना अॅड. शिवम डि. मोरे, अॅड. संकेत ए. जानी, अॅड. सुजय डि. होन, अॅड. सुरेंद्र व्हि, जाधव, अॅड. तन्मय डि. घोडके यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे