संगमनेर

१५०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ करा – आमदार सत्यजित तांबे

१५०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ करा – आमदार सत्यजित तांबे

३९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा मुद्दा

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २९ मार्च २०२५राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी १५०० स्क्वेअर फुटपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ करावा. शास्तीकरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढता आर्थिक बोजा पडत असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

जाहिरात आत्मा

मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले की, अनेक कुटुंबे आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेतात. मात्र करांमुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो. जर सरकारने शास्तीकर माफ केला. तर मध्यमवर्गीय आणि कष्टकरी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या ६०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ आहे. तर ६०० ते १००० स्क्वेअर फुटपर्यंत ५०% सवलत देण्यात आली आहे.

जाहिरात

मात्र त्याऐवजी १५०० स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करावा आणि १५०० ते २००० स्क्वेअर फुटपर्यंत ५०% कर माफ करावा. संगमनेर शहरातील ३९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा मुद्दा उपस्थित केला. या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. त्यामुळे या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे. असे त्यांनी सांगितले सरकारने या नागरिकांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा. मंत्री उदय सामंत यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. १५०० स्क्वेअर फुटापर्यंत शास्तीकर पूर्ण माफ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी घोषणा मंत्री सामंत यांनी केली असे ही आमदार तांबे यांनी सांगितले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे