साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने मोफत माहिती सुविधा केंद्राचे आयोजन-जनार्दन कदम
साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने मोफत माहिती सुविधा केंद्राचे आयोजन-जनार्दन कदम
निवाऱ्यातील रहिवाशी महिलांनी लाभ घ्यावा

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२४– नुकतीच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय नियमानुसार पात्र महिलांना माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत महिन्याला १५०० रुपयेचा लाभ मिळणार असून हा लाभ सर्वच पात्र महिलांना मिळावा या करीता माजी नगरसेवक जनार्धन कदम यांच्या माध्यमातून शहरातील निवारा येथे मोफत माहिती सुविधा केंद्र सुरू झाले आहे.

या विषयी जनार्धन कदम यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. आता पात्र महिला भगिनींना ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तमाम पात्र महिला भगिनींनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करून योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी कोपरगाव शहरातील साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने मोफत माहिती सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. तरी पात्र महिलांनी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत गणेश स्टेज महादेव मंदिर निवारा येथे उपस्थित राहून कागदपत्राची पूर्तता करावी असे आवाहन जनार्दन कदम यांनी केले आहे.





