तहसील कार्यालयात समताच्या माध्यमातून वॉटर कुलर बसविल्याने ; नागरिकांनी व्यक्त केला आनंद
तहसील कार्यालयात समताच्या माध्यमातून वॉटर कुलर बसविल्याने ; नागरिकांनी व्यक्त केला आनंद
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ३ एप्रिल २०२५: कोपरगाव तहसील कार्यालयात तालुक्यातुन येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्था आणि तहसील कार्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने तहसील कार्यालयात वॉटर कुलर बसवण्यात आले असून या वॉटर फिल्टरचा शुभारंभ मंगळवार दि ३ एप्रिल रोजी तहसीलदार महेश सावंत व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जाहिरात
या प्रसंगी कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी संजय गांधी विभाग तर सर्कल अधिकारी मच्छिंद्र पोकळे आदींसह कोपरगाव तहसील कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात आत्मा
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, तहसील कार्यालय व समता पतसंस्थेचे आभार मानले. या सोयीमुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.तर या प्रसंगी तहसीलदार महेश सावंत यांनी काका कोयटे व समता पतसंस्था व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले तर तहानलेल्या जीवाला शुद्ध थंड आणि पुरेसे पाणी देणे या सारखे पुण्य जगात दुसरे काहीच नाही आणि या महान कार्यात समता पतसंस्थेला सहभागी होता आले या बद्दक सुहासिनी कोयटे यांनी तहसीलदार सावंत व नायब तहसीलदार सातपुते यांचे आभार व्यक्त केले.जाहिरात