कोपरगाव येथे शिवसेना सभासद नोंदणी अभियान शिबिर संपन्न
विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे लोकसभा निरीक्षक राजेंद्र चौधरीचे आवाहन

कोपरगाव विजय कापसे दि १३ जुलै २०२४– मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या योजनेतून महिलांना लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त फार्म भरून घेतले पाहिजे.शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाला खचून न जाता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या आदेशाचे आपण काटेकोर पणे पालन करायचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उभे रहा असे आवाहन शिर्डी लोकसभेचे निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी केले.

कोपरगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खा सदाशिवराव लोखंडे यांच्या सुचनेनुसार कोपरगाव तालुका व कोपरगाव शहर शिवसेना सभासद नोंदणीला सुरुवात झाली. या कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राजेंद्र चौधरी बोलत होते.

पोहेगांव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे विजय काळे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख भगीरथ होन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, मीनाक्षीताई वाकचौरे, आरती गाढे,बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ, भाऊसाहेब थोरात, जिल्हा संघटक शिवाजी जाधव, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, सरपंच अमोल औताडे, मनोज राठोड ,प्रशांत रोहमारे, रवीद्र औताडे, घनश्याम वारकर ,कैलास आसणे ,जालिंदर कांडेकर, अनिल होन,प्रभाकर होन, दादाभाई सय्यद, अशोक म्हाळसकर,हौसीराम पाडेकर,शरद घारे, दत्तात्रय भालेराव आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

