विद्यार्थी, लेखकांसाठी लेखन कार्यशाळाचे आयोजन – दुर्गाताई तांबे
विद्यार्थी, लेखकांसाठी लेखन कार्यशाळाचे आयोजन – दुर्गाताई तांबे


भरगच्च कार्यक्रमाबरोबर अभिरुप वाचन अनुभव मिळणार – डॉ.मालपाणी
मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने अनोख्या पद्धतीने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यशाळेत सध्याच्या काळात विविध प्रकारचे अभिरुप वाचन करून दाखवणारे ऑनलाइन संकेतस्थळे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाचन कौशल्य असलेल्या वाचकांची मागणी वाढली आहे.

त्यासाठी वाचन कसे करावे ? या दृष्टीने या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत अभिरूप वाचन करणारे वाचक मार्गदर्शन करणार आहे.तसेच नेमके पणाने कसे लिहावे ? कविता लेखन करताना रचना कशी असावी,बालसाहित्य लिहिताना कोणती काळजी घ्यावी .मुलांनी लिहिताना काय विचार करावा? यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. तसेच ज्या लेखकांना आपली पुस्तके प्रकाशित करायवयाची आहेत.त्यांच्यासाठी प्रकाशकांसोबत संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवशीय कार्यशाळे दरम्यान पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वाचक, शाळा महाविद्यालयाने यांनी पुस्तक खरेदी करावी.जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.

हे आहेत मार्गदर्शक
बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा साहित्यिक डॉ. शकुंतला काळे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथराव आव्हाड ,ऐश्वर्य पाटेकर सिने गीतकार ज्योती घनश्याम, महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे, ज्येष्ठ संपादक प्रकाशन घनश्याम पाटील, डॉ.संतोष खेडलेकर , नागेश शेवाळकर, श्री प्रशांत केंदळे आदी मान्यवर या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.