आपला जिल्हा

कवठे कमळेश्वर ग्रामपंचायत मध्ये ३ लाख ६० हजार रुपयांचा भ्रष्टाचार

कवठे कमळेश्वर ग्रामपंचायत मध्ये ३ लाख ६० हजार रुपयांचा भ्रष्टाचार
कवठे कमळेश्वर ग्रामपंचायत मध्ये ३ लाख ६० हजार रुपयांचा भ्रष्टाचार
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ११ मार्च २०२६कवठे कमलेश्वर येथील ग्रामपंचायत ने पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे गावात सुरक्षा यंत्रणा टावर बसवण्या कामांमध्ये सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगणमताने 3 लाख 60 हजार रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याचे ग्रामपंचायत सदस्य नागेश यादव व लक्ष्मण जोंधळे यांनी केला आहे.

जाहिरात
ग्रामपंचायत सदस्य नागेश मच्छिंद्र यादव व लक्ष्मण भागवत जोंधळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे 13 फेब्रुवारी 2026 रोजी अर्ज करू कवठे कमलेश्वर येथील सरपंच ग्रामसेवक व ठेकेदार यांनी संगनमताने गावामध्ये सुरक्षा टावर यंत्रणा उभारणे कामाच्या नावाखाली 3 लाख 60 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची निदर्शनास आणून दिले. या कामांमध्ये मूळ आराखड्यामध्ये अडीच लाख रुपये तरतूद करण्यात आलेली आहे. सदर कामास कोणतीही प्रशासकीय मान्यता नसून तांत्रिक मान्यता ही घेण्यात आलेली नाही .काम करण्यापूर्वी सदर रक्कम ही ठेकेदाराला देण्यात आली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांनी कवठे कमलेश्वर येथील तत्कालीन सरपंच वालुबाई विठ्ठल वराडे ग्रामसेवक व ठेकेदार यांना गटविकास अधिकारी यांनी नोटीसद्वारे सूचित केले आहेत.

जाहिरात
         सदर काम हे लेखासहिता 2011 मधील नियम प्रकरण 3 मधील नियम 8,9 प्रकरण 12  मधील  नियम 49, 50, 51 ,52 ,53 ,54 ,55 ,56 ,57, 58, 59 ,60, 61 या नियमांचे उल्लंघन झाले असून सदर नोटीस मिळतात सर्व उलटटपाली पुरावे दस्तावेज सादर करावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनीही सदर ग्रामपंचायतला नोटीस बदलली असून 3 लाख 60 हजार रुपये रकमेचा अपहार केल्याच्या बाबत खुलासा करावा अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिले आहेत.

जाहिरात
या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी होऊन दोशींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कवठे कमळेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य नागेश मच्छिंद्र यादव लक्ष्मण भागवत जोंधळे व इतर ग्रामस्थांनी केली आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे