नगराध्यक्ष पराग संधान यांचा निफाड तालुक्यात सत्कार
नगराध्यक्ष पराग संधान यांचा निफाड तालुक्यात सत्कार
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२६–संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुचर्चित अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पराग शिवाजीराव संधान यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील नागरिकांनी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जाहिरात
या प्रसंगी रामाचे पिंपळस गावचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील पुरकर, भाऊसाहेब मतसागर, रामभाऊ सुरवाडे, भरत मतसागर, विष्णूपंत मतसागर, विजय चोरडिया, माजी उपनगराध्यक्ष गणेश आढाव यांच्यासह कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, रामाचे पिंपळस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतेजाहिरातजाहिरात