लायन्स क्लब च्या वतीने सायकल प्रेमी साठी भव्य सायक्लोथॉन
लायन्स क्लब च्या वतीने सायकल प्रेमी साठी भव्य सायक्लोथॉन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १३ सप्टेंबर २०२५–नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स, लिनेस व लियो क्लब कोपरगाव यांच्या वतीने कोपरगावातील सायकल प्रेमींसाठी भव्य ग्रीन राईड सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
जाहिरात
रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळून या स्पर्धेचा प्रारंभ होणार असून ही स्पर्धा १४ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून या स्पर्धे करिता नाव नोंदणी करणाऱ्या प्रथम १०० स्पर्धकांसाठी टी-शर्ट व टोपी मोफत दिली जाणार आहे तर लकी ड्रॉमध्ये पहिले बक्षीस म्हणून ६ हजार ९९९ रुपये किंमतीची हरकुलस कंपनीची सायकल देण्यात येणार आहे तर १५ उत्तेजनार्थ बक्षीसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना लायन्स,लिनेस व लियो यांच्यावतीने सर्टिफिकेट दिले जाणार असून या स्पर्धेचे प्रायोजकत्व कोपरगाव शहरातील प्रसिद्ध न्यू हिंद सायकल शॉप यांनी स्वीकारले आहे.जाहिरात
अधिक माहितीसाठी न्यू हिंद सायकल मार्ट मेन रोड कोपरगाव 9850244288, 8390244288 या नंबर वर संपर्क साधात जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स आनंद ठोळे, डॉ योगेश लाडे, डॉ निलेश गायकवाड, जय बोरा, ओंकार भट्टड, डॉ. वर्षा झवर, भावना गवांदे आदींनी केले आहे.