आपला जिल्हा

आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ५० लाख रुपये निधी मंजूर

आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ५० लाख रुपये निधी मंजूर

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात क वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास होणार

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २२ सप्टेंबर २०२५काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली ठरला आहे. तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांना पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मिळून हे तीर्थक्षेत्र विकसित केले आहे. याचबरोबर नव्याने क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

जाहिरात

या निधीबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्तेची तांबे म्हणाले की, वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान हे नाशिक पुणे महामार्ग लगत आहे. वेल्हाळे व पंचक्रोशीतील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या या तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने पाठपुरावा केला तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी विविध योजनांमधून निधी दिला असून या ठिकाणी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरता सुशोभीकरण करण्यात आले आहे.

जाहिरात

तसेच क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत सन 2024 25 या वर्षातून मौजे कसारा दुमारा येथील श्रीहरी पुरुषोत्तम मंदिर येथील स्नानगृह व स्वच्छतागृह बांधण्याकरता 10 लाख रुपये, संगमनेर खुर्द येथील अमृतेश्वर मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये, खांजापूर येथील अग्नेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण करणे 10 लाख रुपये, सायखिंडी येथील अमर गिरी महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण करणे 10 लाख रुपये, पारेगाव बुद्रुक येथील रेणुका माता मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

या निधीमधून या तीर्थक्षेत्रांच्या सुशोभीकरणासह विविध कामांचा माध्यमातून भाविकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्या यासाठी विकास कामे करण्यात येणार आहे. यापूर्वी आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानसाठी मोठा निधी मिळून देण्यात आला आहे याचबरोबर. हरी बाबा देवस्थान हे क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश व्हावा याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा केला आहे.

हा निधी मिळून दिल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांचे वेल्हाळे ग्रामस्थ, संगमनेर खुर्द कासारा दुमाला खांजापुर सायखिंडी व पारेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे