अहिल्यानागर जिल्ह्यात ११५० बिबटे? काळजी घेण्याचे आवाहन
अहिल्यानागर जिल्ह्यात ११५० बिबटे? काळजी घेण्याचे आवाहन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २१ नोव्हेंबर २०२५– अहिल्यानगर जिल्हयातील एकुण १७०४८०० हेक्टर भौगोलीक क्षेत्रापैकी सुमारे ९.२२ टक्के (म्हणजेच १५७३४५.९६ हेक्टर क्षेत्र) वनक्षेत्र आहे. अहिल्यानगर प्रादेशिक वनविभागात एकूण १५ वनपरिक्षेत्राचा समावेश असुन अहिल्यानगर जिल्हयामध्ये ६ वन्यजीव वनपरिक्षेत्राचाही समावेश आहे. अहिल्यानगर वनविभागात भारतीय वन्यजीव संस्था, देहरादुन यांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारे बिबट्यांची संख्या अंदाजे ११५० असल्याचे सोमवार दि १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी अहिल्यानागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत अहिल्यानागरचे उपवनसंरक्षक धर्मवीर द सालविठ्ठल यांनी सांगितले आहे.
जाहिरात
अहिल्यानगर वनविभागातील कोपरगाव, श्रीरामपुर, राहता, राहुरी, पारनेर, अहिल्यानगर, नेवासा, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले तालुक्यात बारामाही ऊस, मका, नेपियर गवत व फळबागांचे क्षेत्र आहे. मुळा, प्रवरा, गोदावरी या नदयांच्या जवळ व पाणी असलेल्या भागात ऊसाच्या शेतीमुळे बिबट्यास कायम स्वरुपी लपण्याची जागा व पाण्याची सोय, उपलब्ध असणाऱ्या भक्ष्यामुळे बिबटयाने ऊसाचे शेतीचे भागात अधिवास तयार केला आहे. यामुळे ज्या परिसरात ऊस शेती आहे अशा परिसरात बिबट वन्यप्राण्यांचा अधिवास मोठया प्रमाणावर आहे. ऊसाचे पीक हे बिबटयांना लपण्यासाठी सुरक्षित ठिकाण झाले असून ऊसामध्ये असणारे मुबलक नैसर्गिक भक्ष जसे ससे, रानडुक्कर इ. तसेच ऊसाच्या शेतीच्या परिसरामध्ये वाढत चाललेली मानव वस्ती व पाळीव प्राणी यामुळे बिबट वन्यप्राण्यांना आवश्यक खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने ऊसाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीमध्ये ऊसतोड हंगाम चालू झालेला असून सदर हंगामाध्ये मोठयाप्रमाणावर ऊसतोड कामगार रोजगारानिमित्ताने स्थलांतर करतात तसेच नागरिक देखील शेतीच्या कामाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतात.
जाहिरात
ऊसतोड मजूरांचे लहान मुले त्यांच्या सोबत असल्याने ती मूले ऊसाच्या फडामध्ये झोपलेली असतात अशा वेळी बिबट वन्यप्राण्यांकडून लहान मुलांवर जिवघेणा हल्ला होण्याची शकल्या मोठ्या प्रमाणावर असते. शेतकरी व शेतमजूर शतीचे कामे खाली वाकूने करत असतात अशा अवस्थेत बिबट वन्यप्राणी हल्ला करू शकतो. यामध्ये मानव वन्यप्राण्यांनी संघर्षाच्या घटना होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षामध्ये बिबट वन्यप्राण्याकडून मानव तसेच इतर पाळीव प्राण्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा तपशिल खालीलप्रमाणे असून सदरच्या घटना ऊस तोड हंगामात मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे.
जाहिरात
अहिल्यानागर वनविभागामध्ये सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत झालेल्या घटना व त्यांना देण्यात आलेली नुकसानभरपाई रक्कम खालीलप्रमाणे
सदर बैठकीत बिबट प्रवण क्षेत्रातील गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना बिबट वन्य प्राण्यांचा वावर व त्यांच्याकडून होणारे हल्ले तसेच घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये माहिती देणे व बिबट वन्य प्राण्यापासून कशाप्रकारे काळजी घ्यावयाची संबंधी याबाबत जनजागृती करणे संबंधित सूचना देण्यात आल्या.