कोपरगावात प्रथमच एक दिवसीय मिस अहिल्यानगर ब्युटी कॉम्पिटिशन
कोपरगावात प्रथमच एक दिवसीय मिस अहिल्यानगर ब्युटी कॉम्पिटिशन
ब्युटी क्षेत्रातील महिलांना जणू पर्वणीच

कोपरगाव विजय कापसे दि १२ सप्टेंबर २०२५–ग्रामीण भागातील ब्युटी पार्लर क्षेत्रात करू करिअर करू पाहणाऱ्या महिला मुलींकरीता खुले व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कोपरगाव शहरातील हॉटेल पाम पॅराडाईझ येथे सौंदर्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजेच मिस अहिल्यानगर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

ताराराणी मल्टी ट्रेड अँड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड रिच लुक ब्युटी पार्लर तसेच एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दि १८ सप्टेंबर रोजी एकदिवसीय मिस अहिल्यानगर मेकअप कॉम्पिटिशन आयोजित केली असून याप्रसंगी आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट तसेच मिस इंडिया महाराष्ट्र २०२५ प्रियंका मोरे या आधुनिक मेकअप यावर मार्गदर्शन तसेच प्रत्यक्षात मेकअप प्रात्यक्षिक दाखवणार आहे तर या प्रसंगी सारेगमप लिटिल विजेती गौरी पगारे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.


प्रवेश सकाळी-९ ते १०उद्घाटन समारंभ -१० ते ११.३०आर्टिस्ट- ११.३० ते १.३०जेवण- १.३० ते २मेकप कॉम्पिटीशन- २ ते ३लाईव्ह मेकप-३ ते ४.३०रॅम्प वॉक -४.३० ते ५पारितोषिक वितरण-५ ते ६अधिक माहितीसाठी ८८८८४२९१७१,९०११४४७१९०, ७४९८९८९८३७



