थोरात सह. साखर कारखान्याचे काम महाराष्ट्रात आदर्शवत- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
ऊस उत्पादनात एआय सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचाथोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

संगमनेर विजय कापसे दि २० मार्च २०२५–संगमनेर तालुका व अमृत उद्योग समूह हे एक कुटुंब आहे. कारखान्यामुळे अनेक शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी , विविध दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात सामूहिक कष्टातून यश मिळत असते. आगामी काळामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. ए आय सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असून थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम हे महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे गौरवोजगार माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते तर व्यासपीठावर मा. आ. डॉ.सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर, ॲड माधवराव कानवडे, आर.बी. राहणे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, शरयूताई देशमुख, कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, मीनानाथ वरपे ,संपतराव गोडगे, भास्करराव आरोटे ,भाऊसाहेब शिंदे, डॉ तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिकराव यादव , मंदाताई वाघ , मीराबाई वर्पे ,संभाजीराव वाकचौरे ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्यामध्ये अनेक चाके रात्रंदिवस फिरत असतात. मोठ्या कष्टातून हे काम चालते, ऊस तोडणी कामगार रात्री अपरात्री काम करतो, वाहतूक, कारखान्याचे यंत्र, हे सर्व अविरतपणे सुरू राहते. हे मोठे काम आहे .याला कायम ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्त्व जपताना कारखान्याने कायम ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगार ,व्यापारी, छोटे छोटे दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. सहकारामुळे संगमनेरची बाजारपेठ भरलेली आहे.

थोरात कारखान्याने नवीन तंत्रज्ञान अवगत करताना काळानुरूप बदल केले आहेत. 5500 मे टन कारखाना सह 30 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. मागील वर्षात पाच कोटी युनिट वीज वितरित केली असून रिकव्हरी चांगली राखली आहे.

कार्यक्षेत्रामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून आगामी काळामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. त्यातून उसा संबंधाने सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहने निर्माण झाली असून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या येतील त्यामुळे काळाबरोबर राहावे लागणार आहे.
आपण कायम चांगले व प्रामाणिक काम केले. कुणापेक्षाही आपण सरस आहोत. सहकार चांगला आहे. आपली राजकारणाची पद्धत परंपरा चांगली आहे. ती टिकवायची आहे. हे सर्व मोडण्याचा प्रयत्न होणार आहे पण त्या ठिकाणी वेळीच प्रतिकार आपण केला पाहिजे.

मा आ.डॉ तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्व घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेची तळमळ असलेले व्यवस्थापन येथे आहे . संगमनेरच्या सहकाराचा अत्यंत शुद्ध भाव असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याची परंपरा ही कारखान्याने कायम जपली आहे. बेस्ट मॅनेजमेंट हे या सहकाराचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे ते म्हणाले.
तर बाबा ओहोळ म्हणाले की मागील पाच वर्षात कारखान्याने इथेनॉल व अल्कोहोल निर्मितीमध्ये विस्तारीकरण केले आहे, वीज निर्मिती चांगली होत आहे, कारखान्यावरील कर्ज फेडले आहे. नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. चांगला भाव देण्याचे काम कारखान्याने केले आहे. तालुक्याची ही चांगली वाटचाल सर्वांना जपायची असून सध्या तालुक्यामध्ये लाईट नाही .पाणी पळवले जात आहे याकडे नवीन लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी अविनाश सोनवणे, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, नवनाथ आंधळे, अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ,विजय राहणे, श्रीमती ललिता दिघे, नानासाहेब शिंदे, अजित काकडे, सेक्रेटरी किरण कानवडे, लक्ष्मण खेमनर, धनंजय डाके, यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर गणपतराव सांगळे यांनी आभार मानले.
कांचनताई थोरात यांचे अभिष्टचिंतन
सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून अमृत उद्योग समूहातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन करण्यात आले. सौ. कांचनताई थोरात या अत्यंत नम्र व धार्मिक स्वभावाच्या आहेत. साहेब राज्यात जबाबदारी सांभाळत असताना कुटुंब व तालुक्यातील कार्यकर्त्यांची जबाबदारी कायम कांचनताई थोरात यांनी सांभाळली असल्याचे गौरवद्गार दुर्गाताई तांबे यांनी काढले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस गळीतात जिल्ह्यात अव्वल
– अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा सहकारी साखर कारखान्यात पहिला क्रमांक
– 8 लाख 25 हजार 900 मेट्रिक टन ऊस गाळप
– वेळेत शेतकऱ्यांचे पेमेंट करण्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर
– ऊस दराच्या बाबतीतही जिल्ह्यात अव्वल
– वीज उत्पादन आणि निर्यातीतही जिल्ह्यात पहिला क्रमांक