आपला जिल्हा
साकूर रुग्णालयात आमदार सत्यजित तांबेंची पाहणी; डॉक्टरांच्या सेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार
साकूर रुग्णालयात आमदार सत्यजित तांबेंची पाहणी; डॉक्टरांच्या सेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार

संगमनेर विजय कापसे दि २४ मे २०२५– साकुर येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अडचणींचा सामना करत असले तरी येथील आरोग्यसेवा समाधानकारकपणे सुरू आहे. या रुग्णालयाची स्थापना माझ्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात झाली असून, ही वास्तू माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.