संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात ‘नागार्जुन’ रसशाळेचा’ शुभारंभ
संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात ‘नागार्जुन रसशाळेचा’ शुभारंभ
प्रात्यक्षिक शिक्षणातून आयुर्वेद संशोधनाला नवी दिशा

कोपरगाव विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आयुर्वेद महाविद्यालय अँड रिसर्च सेंटरमध्ये नववर्षाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘नागार्जुन रसशाळेचा’ शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे कलावती नितिनदादा कोल्हे यांच्या हस्ते या रसशाळेचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार , विभागप्रमुख डॉ. स्वप्निल कासार यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रसशाळा भैषज्य कल्पना विभागांतर्गत उभारण्यात आली असून, विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी बोलताना विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सांगितले की, संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून संजीवनी आयुर्वेद महाविद्यालय अल्पावधीतच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहे. आयुर्वेद शिक्षणामध्ये रसशाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून ती आयुर्वेदिक औषध निर्मितीची कणा मानली जाते. औषध निर्मितीबरोबरच संशोधन, प्रयोगशीलता आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण हे या रसशाळेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची गोरगरीब रुग्णांनाही परवडणाऱ्या माफक दरात आयुर्वेद उपचार उपलब्ध व्हावेत, अशी इच्छा होती. त्यांच्या या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातून सक्षम आयुर्वेद वैद्य घडावेत या उद्देशाने संजीवनी आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. प्रात्यक्षिक शिक्षण, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवे उपक्रम राबविणारी ही संस्था भविष्यात आयुर्वेद शिक्षण व संशोधन क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करेल, असा विश्वास आहे.
नितिनदादा कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स , कोपरगाव



