शालेय जिल्हास्तरीय जीत कुणे डो स्पर्धेत आर्यवीर कराटे क्लब प्रथम

शालेय जिल्हास्तरीय जीत कुणे डो स्पर्धेत आर्यवीर कराटे क्लब प्रथम
शालेय जिल्हास्तरीय जीत कुणे डो स्पर्धेत आर्यवीर कराटे क्लब प्रथम

कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२५–क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अहील्यानगर तसेच जीत कुणे डो असोसिएशन अहिल्यानगर,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय जित कुने डो स्पर्धा ५ डिसेबर २०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल कोपरगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या.. सदर स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातून वेगवेगळ्या वजन आणि वयोगटात जवळपास 200 मुला – मुलींनी सहभाग घेतला.

कोपरगाव येथील आर्यवीर कराटे क्लबच्या 6 स्पर्धकांनी या शासकीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.6 पैकी 5 स्पर्धकांनी आपआपल्या वय आणि वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून त्यांची सोलापूर येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरावर निवड झाली आहे. प्रथम आलेले स्पर्धक *सरस ठोळे, हर्ष धनवटे, मृण्मय मंडलिक, आराधना त्रिभुवन, स्तुती त्रिभुवन आणि याच स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला महंत बिहारे याने यशस्वी सर्व स्पर्धकांना आर्यवीर कराटे अकॅडमीच्या संचालिका ॲड. स्नेहल पांढरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि विभागीय जीत कुणे डो स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.



