सहकारमहर्षी टी20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ तर चषकाचा राज्यात लौकिक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
सहकारमहर्षी टी20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ तर चषकाचा राज्यात लौकिक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
जाहिरात
संगमनेर विजय कापसे दि १ जानेवारी २०२६-लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे भारतीयांचे आवडते विषय असून संगमनेरची सहकारमहर्षी क्रिकेट स्पर्धा राज्यभरात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवउद्गार माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले असून नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचा धमाकेदार समारंभ झाला.
जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने 26 व्या T 20 क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सौ. दुर्गाताई तांबे, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे,के.के.थोरात, सौरभ कासार,राहुल गडगे,निलेश चव्हाण, सर्वोदय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी, राहुल गडगे, राजाभाऊ काजळे,नितीन हासे, अनुप अरगडे,तुषार शिंदे,योगेश भालेराव, शैलेंद्र साबळे, महेश मयूर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, ॲड.सुहास आहेर व क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.जाहिरात
यावेळी बोलताना माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, क्रिकेट, राजकारण, आणि सिनेमा हे भारतीयांचे आवडते विषय आहे. क्रिकेट बरोबर इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे याकरता क्रीडा संघटनांनी प्रयत्न करावे. संगमनेर मधील चांगले आयोजनामुळे या स्पर्धेचा राज्यभरात मोठा लौकिक झाला असून देशभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. पुढील 17 दिवस संगमनेर मधील क्रीडा रसिकांना ही मोठी मेजवानी असल्याचे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर सहकारी शेतकी संघाची जागा या मैदानासाठी दिली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात अद्यावत क्रीडा संकुल येथे उभे राहिले असून यामुळे युवकांना खेळण्यासाठी मोठी संधी मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या.
तर ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, आमदार सत्यजित तांबे यांच्या चांगल्या योजनामुळे ही स्पर्धा लोकप्रिय ठरली असून इतर खेळांच्या स्पर्धाही या मैदानावर ही क्रीडा मैदानावर राबवण्यात येतील असे ते म्हणाले.
पहिला सामना मेरी क्रिकेट क्लब नाशिक व सह्याद्री संगमनेर यांच्यामध्ये झाला यावेळी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धमाकेदार सुरुवात
मेरी क्रिकेट क्लब व संगमनेर सह्याद्री यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामनात षटकारा,चौकारांची आतिषबाजी झाली. ढोल ताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा उत्साह हे या पहिल्या सामन्याची वैशिष्ट्य ठरले नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा सर्व उपस्थित मान्यवरांनी दिले.