संजीवनी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड
संजीवनी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड
ग्रामीण भागातील पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजीवनी कटिबद्ध

कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२६– संजीवनी इंजिनिअरींगच्या चार विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळाली. त्यात आयटी विभागाच्या तीन आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचा एक अशा चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण देत त्यांना नामांकित उद्योगांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या व पालकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

क्रेडेन्का डेटा सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड कंपनीने वेदांत वैभव थोरात (आय टी) याची तर कणाका सॉफ्टवेअर कंपनीने शशांक सतीश फिस्के (आय टी) याची नोकरीसाठी निवड केली. आरस्क्वेअर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज कंपनीने विशाल विजय औताडे (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग) व ईशान राजेंद्र ससाणे (आय टी ) यांना नोकरीची संधी दिली. या चारही विद्यार्थ्यांना या कंपन्यांनी आकर्षक पॅकेज दिले. हे चारही विद्यार्थी ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आहेत.

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त आहे.त्यामुळे उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करणे शक्य होते. कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रामाला प्राधान्य दिले जाते. त्याचा परिणाम म्हणून नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने संधी देतात. या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रीत केले.नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापन सोबत सातत्याने संपर्क ठेवण्यावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यात चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी संस्था कटिबध्द आहे.

महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक ज्ञान, गटचर्चा, सादरीकरण कौशल्य यांसारख्या विविध बाबींवर विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यात येते. उद्योग विश्वाच्या अपेक्षा लक्षात घेऊन तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम होत आहे. परिणामी, प्रतिष्ठित कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची निवड होत असून त्यांना आकर्षक वेतनाच्या नोकऱ्या मिळत आहेत.

या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके यांचे अभिनंदन केले आहे.




